Breaking
ई-पेपर

*महिला आर्थिक सक्षमीकरणाचा प्रेरणादायी जागर; ज्ञानेश्वरी लोकसंचालित साधन केंद्राची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

0 8 9 9 9 3

*महिला आर्थिक सक्षमीकरणाचा प्रेरणादायी जागर; ज्ञानेश्वरी लोकसंचालित साधन केंद्राची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

नेवासा | प्रतिनिधी-

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन प्रेरणेतून तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वरी लोकसंचालित साधन केंद्र, नेवासा कार्यालयाची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भेंडा बु. येथील नागेबाबा मार्ट परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या सभेस सौ. रतनमालाताई लंघे पाटील यांच्या समवेत उपस्थित राहून महिला बचत गटांच्या कार्याची माहिती घेण्यात आली. यावेळी महिला भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या अंगभूत कौशल्यांना व्यावसायिक स्वरूप देणे, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन निर्माण करणे आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या दृष्टीने साधन केंद्राचे कार्य उल्लेखनीय असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
बचत गटांच्या उत्पादनांना मिळाले कौतुक
सभेच्या निमित्ताने बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू व उत्पादनांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सला भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची पाहणी करण्यात आली. महिलांच्या कल्पकतेला, मेहनतीला आणि उद्योगशीलतेला यावेळी विशेष दाद देण्यात आली.
बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी केवळ आर्थिक व्यवहाराचे व्यवस्थापन शिकण्यापुरते मर्यादित न राहता उत्पादन, विक्री, बाजारपेठ, आर्थिक नियोजन आणि स्वयंरोजगाराच्या क्षेत्रातही उल्लेखनीय पाऊल टाकले आहे. त्यामुळे अशा उपक्रमांमधून ग्रामीण महिलांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र सभेत पाहायला मिळाले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी श्री. उमेश कहाते, विभागीय अधिकारी श्री. नवनाथ तारक, अध्यक्षा आरती नायडू, सरपंच श्री. किशोर मिसाळ, श्री. आबासाहेब काळे, श्री. बाळासाहेब क्षीरसागर, आर्थिक साक्षरता समन्वयक श्री. रविंद्र काळे, सौ. उमेध मॅडम, सौ. भारतीताई बोंदे, श्री. गणेश महाराज, तालुका समन्वयक श्री. मयुर कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे संचालक, पदाधिकारी, बचत गटातील महिला भगिनी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ देणारे उपक्रम गावागावांत पोहोचविणे आणि ग्रामीण महिलांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करणे, हीच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाची प्रभावी वाटचाल असल्याचा संदेश या वार्षिक सर्वसाधारण सभेतून देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे