महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचाआमदार विठ्ठलराव लंघे यांनी घेतला आढावा..

*महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचाआमदार विठ्ठलराव लंघे यांनी घेतला आढावा….!
नेवासा प्रतिनिधी…
“नेवासा तालुक्यात रुग्णांची गैरसोय लक्षात घेता पहिले तालुक्यासाठी प्रथमच प्रायमस मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, या उद्देशाने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील चालू असलेल्या रुग्णांच्या सेवा कार्यासंदर्भात जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी समिती’चे सदस्य म्हणूनआज आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी आज प्राईमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिल्हा समन्वयक डॉ.श्री. रोहितजी कारंडे यांनी योजनेच्या कामकाजाची सविस्तर माहिती देऊन आमदार महोदयांचे मार्गदर्शन घेतले. रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येक रुग्णाची आमदार लंघे यांनी आवर्जून विचारपूस केली आणि त्यांना योजनेचा लाभ योग्य प्रकारे मिळतोय ना, याची खात्री केली. विशेषतः ऑपरेशन झालेल्या व किडनी, डायलिसिसच्या रुग्णांची त्यांनी जातीने चौकशी करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
याप्रसंगी प्राईमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. निलेश शंकरराव लोखंडे पाटील यांनी आमदार विठ्ठलराव लंघे यांचे स्वागत केले आणि रुग्णालयामार्फत योजनेबरोबरच इतर राबविल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सुविधांची माहिती त्यांनी दिली. आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरजू रुग्णाला योजनेचा पूर्ण लाभ मिळावा, यासाठी रुग्णालय प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार लंघे यांनी तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले की नेवासा तालुक्यातील सर्व तमाम जनतेने आपले ‘आयुष्मान भारत कार्ड लवकर काढावे जेणेकरून योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजूंना वेळेवर आणि मोफत उपचार घेता येतील. नेवासा तालुक्यात प्रथमच गोरगरिबांसाठी मोफत उपचार चालू होऊन नेवासा तालुक्यातील व परिसरातील वाडी ,वस्ती खेडोपाडी असलेले असंख्य रुग्ण या योजनेचा लाभ घेत उपचार व ऑपरेशन होऊन बरे होत आहेत याचा आनंद निश्चितच होत आहे. असे बोलत आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी प्रायमस हॉस्पिटल प्रशासनाचे अल्पावधीत गोरगरिबांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोहोचल्याबद्दल कौतुक व समाधान व्यक्त केले त्याचबरोबर डायलेसिस पेशंटसाठी आता पुणे, अहिल्यानगर ,संभाजीनगर ला कायमस्वरूपी जात असलेले रुग्ण त्यांचीजाण्या येण्याची गैरसोय आता बंद झाल्यामुळे आता आपल्या परिसरातच नेवासा फाट्यावरच डायलिसिस मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांनीच आमदार लंघे यांचे आभार मानले.”
………..//……….//……….//……..//………//..
‘जन आरोग्य’ योजनेचा घेतला आढावा… असंख्य रुग्णांना मोफत योजनेचा लाभ पोहोचवल्याबद्दल आमदार साहेबांकडून हॉस्पिटल प्रशासनाचे कौतुक..




