Breaking
ई-पेपर

*विधापरिषदेचे उपसभापती सचिन अहिर व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते शनि शिंगणापूर येथे श्री शनैश्वर महाराजांना तेलाभिषेक*

0 9 0 0 1 7

*विधापरिषदेचे उपसभापती सचिन अहिर व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते शनि शिंगणापूर येथे श्री शनैश्वर महाराजांना तेलाभिषेक*

नेवासा प्रतिनिधी –

महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती मा. सचिन अहिर साहेब आणि नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे श्री शनैश्वर महाराजांना विधिवत तेलाभिषेक करण्यात आला. यावेळी दोन्ही मान्यवरांनी श्री शनैश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेत जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.


श्री शनैश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी जनतेच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदावी, सर्वांचे कल्याण व्हावे, अशी मनोभावे प्रार्थना केली. धार्मिक विधीच्या निमित्ताने शनि शिंगणापूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या धार्मिक कार्यक्रमास पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष करणसिंह घुले, जिल्हाप्रमुख नितीनजी औताडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा, शिवसेना नेते हरिभाऊ शेळके, राजू शेटे, नगरसेवक गटनेते महेश लोखंडे, नगरसेवक संदीप सरकाळे, नगरसेवक प्रवीण सरोदे, सरपंच भरत बेल्हेकर, संदीप दादा बानकर यांच्यासह शिवसेना-भाजप महायुतीतील घटक पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक भक्त उपस्थित होते.
श्री शनैश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. मंदिर परिसरात जय शनैश्वर महाराजांच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भाविकांनीही श्री शनैश्वर महाराजांचे दर्शन घेत आपल्या कुटुंबासह सर्वांच्या सुख-शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

“१९९२ सालापासून शनि शिंगणापूर देवस्थान परिसरातील लोकांबरोबर माझे एक आगळेवेगळे नाते राहिले आहे. देशभरातून शनिदेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सुविधा यापूर्वीच मिळायला हव्या होत्या. मात्र महायुती सरकारच्या काळात भाविकांच्या सुविधांसाठी प्रामाणिकपणे काम सुरू आहे, याचा आनंद आहे. शनिदेवाच्या चरणी नतमस्तक होताना महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर करावीत आणि राज्यातील जनतेला सुख-शांती व समृद्धी लाभावी, असे साकडे शनिदेवाला घातले आहे.”

— सचिन अहिर, उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे