Breaking
ई-पेपर

*नेवासा ते पंढरपूर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यासाठी स्वागताचे आवाहन*

0 8 9 9 6 5

*नेवासा ते पंढरपूर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यासाठी स्वागताचे आवाहन*

नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नेवासा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे प्रस्थान बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र नेवासा येथून पंढरपूरकडे होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, वारकरी भाविक व ग्रामस्थांना पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

पालखी स्वागतासाठी संस्थानने अधिकृत फ्लेक्स बोर्ड डिझाईन तयार केले असून, संबंधित गावांनी त्याच नमुन्यानुसार स्वागत फलक उभारावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पालखी सोहळ्याची नियोजन पत्रिका गावांना पाठविण्यात आली असून त्यामध्ये पालखी कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला संबंधित गावातून मार्गक्रमण करणार आहे, याची माहिती देण्यात आली आहे.

संस्थानच्या सूचनेनुसार, ज्या गावांमध्ये पालखीचा दुपारचा विसावा आहे त्या ठिकाणी स्वागत फलकावर ‘दुपारचा विसावा’ असा उल्लेख करावा. तसेच ज्या गावांमध्ये पालखीचा रात्रीचा मुक्काम असणार आहे, त्या ठिकाणी ‘पालखी तळ’ असा उल्लेख वेळापत्रकानुसार करावा.

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यास यंदा वाढता प्रतिसाद मिळत असून, पालखी मार्गावरील गावांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नेवासा व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा समितीच्या वतीने सर्व भाविकांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन माऊलींचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे