Breaking
ई-पेपर

मौजे नजीकचिंचोली तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे वैष्णव सेवाश्रम बऱ्हाणपूर शेवगाव आयोजित भव्य फिरता हनुमान चालीसा सोहळा ३ जानेवारीपासून होणार प्रारंभ…..

भव्य फिरता हनुमान चालीसा सोहळा ३जानेवारी २०२६रोजी होणार प्रारंभ... हनुमान भक्तांसाठी मोठी पर्वणी....

0 6 0 5 0 3

मौजे नजीकचिंचोली तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे वैष्णव सेवाश्रम बऱ्हाणपूर शेवगाव आयोजित भव्य फिरता हनुमान चालीसा सोहळा ३ जानेवारीपासून होणार प्रारंभ…..

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा.

भव्य फिरता हनुमान चालीसा सोहळा ३जानेवारी २०२६रोजी होणार प्रारंभ… हनुमान भक्तांसाठी मोठी पर्वणी….

हा भव्य फिरता हनुमान सोहळा देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज तसेच देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथून सुरुवात होत आहे.

या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती ह.भ.प भारतीनंदगीजी महाराज, तसेच ह.भ.प सोमेश्वर महाराज गवळी ह.भ.प निलेश महाजन वानी यांची असनार आहे .

आशीर्वाद प.पु. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड देवस्थान) , ह भ प देविदास महाराज मस्के श्री क्षेत्र ज्ञानेश्वर देवस्थान नेवासा, ह भ प दादा महाराज वायसळ, ह.भ.प शिवानंदजी महाराज शास्त्री, ह भ प शास्त्री शितलताई देशमुख, ह भ प दीपक महाराज उगले, ह भ प योगेश महाराज दुधाळ, ह भ प विकास महाराज औटी, ह भ प अमोल महाराज घाडगे, ह भ प महेश महाराज घाडगे, ह भ प आकाश महाराज नजन, ह भ प सोपान महाराज दारकुंडे, ह भ प संदीपजी महाराज ढवळे,
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये हनुमान चालीस मंडळ बऱ्हाणपूर, आव्हाने खुर्द, अमरापूर, काळेगाव ,साकेगाव, हनुमान टाकळी, लखमापूर ,तेलकुडगाव, देडगाव, लांडे वस्ती शेवगाव ,सामनगाव, हनुमान वाडी, मळेगाव, देवगाव ,पिंपरीशाली कुकाना, भेंडा ,शिरसगाव, पाथरवाला गोपाळपूर, दहिगाव- ने दक्षिण मुखी हनुमान मंदिर भेंडा, तामसवाडी ,हनुमान नगर, तेलकुडगाव गेवराई, शिंदेवाडी पुणे खामगाव, प्रवरासंगम, खामपिंपरी, औरंगपूर, शेळके पवार वस्ती वाघोली, आव्हाने बु आधी गावांची भक्तमंडळी या हनुमान चालीसा सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत.

या भव्य फिरते हनुमान चालीसा सोहळ्याच्या प्रसंगी परमपूज्य हभप भारतानंदगिरीजी महाराज वेदांत साधना लांडेवडगाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ७ ते ८या वेळेमध्ये आशीर्वादपर प्रवचन होणार आहे.

यामध्ये स्वागत उत्सुक म्हणून चिंचोली खडेश्वरी देवस्थानचे ह.भ.प गणेशानंदगिरीजी महाराज व समस्त ग्रामस्थ चिंचोलीकर यांनी मोठ्या उत्साह सहभागी होणार आहेत. या फिरत्या हनुमान चालीसा सोहळ्याचे हे चौथे वर्ष असून या हनुमान चालीसा सोहळ्या मध्ये हजारो भाविकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे