Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपर

*गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात अन् आनंदात साजरा*

*विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका; अबॅकस अभ्यासक्रम सुरू करण्याची संस्थाप*

0 9 0 1 0 3

गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात अन् आनंदात साजरा

विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका; अबॅकस अभ्यासक्रम सुरू करण्याची संस्थापक विजय नाबदे यांची घोषणा

नेवासा तालुका प्रतिनिधी –

शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा आणि संस्कारांची शिदोरी देणारा मार्गदर्शक असतो, या भावनेतून माळेवाडी-वरखेड ता. नेवासा येथील गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विजय नाबदे सर होते. यावेळी प्राचार्य सचिन टाक सर, उपप्राचार्य सौ. सोनाली आंबेकर, सहशिक्षक अमोल दरवडे, सहशिक्षिका अश्विनी राजगुरू, योगिता दरवडे, पूजा नाबदे, योगिता कुंडारे, अर्चना पवार, वैष्णवी वाघ यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध उपक्रम, मनोगते आणि मनोरंजक खेळांचे आयोजन केले. शिक्षकांकडून मिळणारे ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन आणि प्रेम यांचा गौरव करत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना शिक्षकांसाठी विशेष आनंददायी ठरल्या.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या विविध जबाबदाऱ्या तसेच शाळेतील प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका उत्स्फूर्तपणे साकारल्या. अमित कावळे याने प्राचार्यपदाची, तर स्वरा काळे हिने उपप्राचार्यपदाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण शाळेच्या परिसरात आनंदाचे, उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.

गुरुकुलमध्ये आता अबॅकसचा नवा अभ्यासक्रम

शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थापक विजय नाबदे सर यांनी गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘अबॅकस’ हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणे, गणितीय कौशल्य विकसित करणे आणि अभ्यासातील गती वाढविण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संतोष गढेकर, बाबासाहेब क्षिरसागर, नवनाथ साळुंके, संतोष सपकाळ मामा आणि वाघ मावशी यांचेही कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचा आनंदी सहभाग आणि आपुलकीच्या वातावरणामुळे गुरुकुल पब्लिक स्कूलमधील शिक्षक दिनाचा सोहळा स्मरणीय आणि अविस्मरणीय ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 1 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे