Breaking
ई-पेपर

चिमुकल्यांच्या कलेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद..

कुकाणा जि. प.केंद्र शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

0 6 0 4 8 0

चिमुकल्यांच्या कलेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद..

कुकाणा जि. प. केंद्र शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कुकाणा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात पार पडले. चिमुकल्यांच्या या कलेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन ,कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ.लताबाई विठ्ठलराव अभंग यांनी केले, ,उपसरपंच सौ.शुभांगी सोमनाथ कचरे , उपमुख्यद्यापक शारदा टेकाडे,मा.सरपंच एकनाथ कावरे, माजी उपसरपंच बाळासाहेब कचरे, प्रगतशील शेतकरी मछिंद्र कावरे भाऊसाहेब फोलाणे,सोमनाथ कचरे, सुनील पंडित,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कावरे उपाध्यक्ष सौ. डॉ. पूजा भागवत,निवृत्त विस्तार अधिकारी सुनील जाधव,केंद्र प्रमुख सौ. कमल लाटे, शिक्षक बँकेचे चेअरमन रामेश्वर चोपडे, किरण शिंदे,पांडुरंग काळे,सदस्य सौ.वर्षा चाबुकस्वार,विष्णुपंत पवार, निवृत शिक्षक नामदेव उंडे आदि,व्यासपीठावर उपस्थित ,होते.

 

स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.या प्रसंगी चिमुकल्या विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकली , त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देत मान्यवरांनी ही बक्षिसांचा वर्षाव केला , या वेळी कुकाणा सर्व ग्रामपंचायत सदस्य , तसेच सर्व ग्रामस्थ , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सौ.सोनाली सदावर्ते,सौ.सोनाली गोर्डे
विकास भेंडेकर,दीपक पंडित,अजिनाथ आत्माराम वाबळे,अमरनाथ गवळी,
सदस्य, अण्णासाहेब गायकवाड, संतोष भूमकर, दीपक पंडित, प्रवीण नाबदे, सौ.परवीन शहा, वैभव चेंमटे,
शिक्षक ,महेंद्र वडिंनकर,पोपट शिंदे,,अर्जुन शिरसाठ ,बाळासाहेब डाके,सारीका हाराळे, साधना पांचग, माधवी पचारणे,वैशाली टन्नू , शिक्षक , पालक संघ , माता पालक संघ , आदींनी परिश्रम घेतले, या स्नेहसंमेलन करीता सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक, प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक, डाॅक्टर कुकाणा विद्यालयातील सेवकवर्ग यांच्यासह पालक, ग्रामस्थ, परिसरातील जिल्हा परिषद शाळेमधील केंद्र प्रमुख, शिक्षक उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश राऊत तर आभार प्रदर्शन सतीश चाबुकस्वार यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक अशोक राठोड यांनी केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे