Breaking
ई-पेपर

*कै. सौ. आशाबाई सुभाषराव आष्टेकर यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक सभागृह व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भव्य तैलचित्राचे दिमाखात उद्घाटन*

0 8 9 9 9 5

*कै. सौ. आशाबाई सुभाषराव आष्टेकर यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक सभागृह व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भव्य तैलचित्राचे दिमाखात उद्घाटन*

नेवासा :

नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल आणि कै. सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयाच्या प्रांगणात पुत्र तथा उद्योजक अभिजीत सुभाषराव आष्टेकर (वांबोरीकर) यांनी दिलेल्या नवनिर्मित ‘सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन’ तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना करतानाचे १८×१० फूट आकाराचे भव्य तैलचित्राचे अनावरण आज, सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण माजी मंत्री नामदार शंकररावजी गडाख यांच्या शुभहस्ते सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन व भव्य तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नेवासा येथील वेदान्ताचार्य ह.भ.प. श्री. देवीदासजी महाराज म्हस्के यांची विशेष उपस्थिती लाभली.

मा. श्री. सुभाष बाबुराव आष्टेकर (वांबोरीकर), मा. श्री. रावसाहेब चौधरी, प्राचार्य, ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा तसेच मा. सुरेखा पारखे, प्राचार्या, कै. सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालय, नेवासा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक संभाजी धोत्रे, स्वप्निल मापारी, मुक्तारभाई शेख, अनिल शिंदे, दिनेश व्यवहारे, लक्ष्मणमामा जगताप, रणजीत सोनवणे, राजूशेठ महाजन, शशिकांत नळकांडे, प्रवीण मापारी, महेश मापारी, तसेच नेवासा मेडिकल असोसिएशनचे डॉ. शंकरराव शिंदे, उद्योजक बाळासाहेब मुथा, निलेश जोशी, सत्यजित उदावंत, विठ्ठल उदावंत, कैलास लष्करे, स्वप्निल साखरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्मित सांस्कृतिक सभागृहामुळे शाळेतील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि सच्चिदानंद बाबांचे ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना करतानाचे भव्य तैलचित्र हे नेवासाच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारे ठरणार आहे.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, शिक्षण, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम नेवासाच्या वैभवात भर घालणारा आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथील प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यास परिसरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे