Breaking
ई-पेपर

*घेऊन विठू नामाचा गजर, माऊलींच्या पालखीचा ध्यास!* *ताकेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांचा भक्तिरसात न्हालेला ‘भव्य दिंडी सोहळा’ उत्साहात संपन्न*

0 8 9 9 8 9

*घेऊन विठू नामाचा गजर, माऊलींच्या पालखीचा ध्यास!*
*ताकेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांचा भक्तिरसात न्हालेला ‘भव्य दिंडी सोहळा’ उत्साहात संपन्न*

नेवासा प्रतिनिधी | महाराष्ट्र 7 न्यूज वृत्तसेवा

“जय जय राम कृष्ण हरी… ज्ञानोबा माऊली तुकाराम…” या अखंड नामघोषाने आज ताकेवस्ती नगरी दुमदुमून गेली. विठ्ठलभक्तीचा अनोखा संस्कार चिमुकल्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ताकेवस्ती (ता. नेवासा) येथे शनिवार, दि. १८ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला भव्य दिंडी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सकाळी ठीक ८.०० वाजता विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करून दिंडीचे प्रस्थान झाले. पारंपरिक वारकरी वेशभूषेत सजलेले विद्यार्थी, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी, हाती भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड जयघोषात गावातून मार्गक्रमण करताना संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. चिमुकल्या वारकऱ्यांचा हा भक्तिभाव पाहून ग्रामस्थही भारावून गेले.
या दिंडी सोहळ्यात ताकेवस्ती गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थ, पालक आणि वारकरी बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. शिस्त, भक्ती आणि संस्कार यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
शालेय व्यवस्थापन समिती, ताकेवस्ती यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, संत साहित्य आणि अध्यात्मिक मूल्यांचे संस्कार रुजविणारा हा उपक्रम सर्वांच्या मनाला भावला. या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा, शिक्षक, व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या दिंडी सोहळ्यासाठी शिक्षक दांपत्य श्री प्रदीप उकांडे व शिक्षिका श्रीमती सुमती चौरे ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गणेश ताके, ताकेवस्ती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. श्री गणेश ताके पाटील, यांनी विशेष परिश्रम घेतले .

पालक श्री , शरद ताके, श्री देवदास ताके सर, भारत ताके सुरेश ताके, ज्ञानेश्वर ताके ज्ञानेश्वर तुपे अमोल ताके हरीभाऊ ताके भाऊसाहेब बागडे व महिला भगिनी व ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे