Breaking
ई-पेपर

*आदित्य नजन यांनी शाळेत 25 वृक्षाचे वृक्षारोपण करून साजरा केला वाढदिवस.

0 4 5 9 8 3

*आदित्य नजन यांनी शाळेत 25 वृक्षाचे वृक्षारोपण करून साजरा केला वाढदिवस.*

भेंडा – (प्रतिनिधी )- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील
भेंडा बु ॥ येथील रहिवासी असलेले आदित्य अण्णासाहेब नजन ह्याचा दिनांक 10 जून रोजी 25 वा वाढदिवस होता. या वाढदिवसाचे औचित्य साधत आदित्यचे वडील अण्णासाहेब नजन यांनी आपला मुलगा शिकलेल्या जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हायस्कूल भेंडा या शाळेत वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याचे ठरवले पंचविसावा वाढदिवस असल्यामुळे पंचवीस वृक्षाचे रोपण जिजामाता माध्यमिक विद्यालय या ठिकाणी करण्याचे ठरले त्याप्रमाणे त्यांनी पंचवीस वृक्ष आणले तसेच जेसीबी आणून 25 वृक्षासाठी खड्डे घेतले व मान्यवरांच्या हस्ते सर्व वृक्षांचे वृक्षारोपण केले एवढेच नव्हे तर त्या सर्व वृक्षांनाही संरक्षण लाभाव यासाठी त्याला जाळीही लावण्यात आली खरं तर आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ग्लोबल वार्मिंग यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे जगाला भेडसावणारी ही समस्या जर कुठे सोडवायची असेल तर त्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आणि हीच काळाची गरज अण्णासाहेब नजन यांनी ओळखली आणि आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वृक्षारोपण केले खरोखर समाजाला दिशा देणारा दिशादर्शक निर्णय अण्णासाहेब नजन यांनी घेतल्यामुळे परिसरामधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी बोलताना अण्णासाहेब नजन यांनी म्हटले की भेंडा गाव हे खूप मोठे गाव असल्यामुळे या गावातील अनेक तरुणांनी आपल्या वाढदिवसाला जर वृक्षारोपण केले तर भेंडा गाव हिरवाईने नटलेलं स्वच्छ सुंदर गाव होण्यास वेळ लागणार नाही या वृक्षारोपण प्रसंगी जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य मुंगसे सर त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी – भारत वाबळे नेवासा बाजार समितीचे माजी अध्यक्ष – डॉ . शिवाजी शिंदे डॉ . संतोष फुलारी ,सुनील वांडेकर ,अशोक पंडित, अण्णासाहेब नजन , पत्रकार नामदेव शिंदे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 9 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे