*सुरेगाव (गंगा)-बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचे ९ सदस्यपदांचे आरक्षण जाहीर*
*सुरेगाव (गंगा)-बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचे ९ सदस्यपदांचे आरक्षण जाहीर..*
नेवासा, प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा-बोरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यपदाचे आरक्षण दि.११ जून २०२६ ला जाहीर झाल्यानंतर गावातील राजकीय वातावरण तापले आहे.
एकूण ९ सदस्यपदांसाठी ३ वार्ड निश्चित करण्यात आले आहेत. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार वार्डनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे आहे :
*वार्ड क्र. १* : एक जागा – अनुसूचित जमाती व्यक्ती, दोन जागा – सर्वसाधारण स्त्री
*वार्ड क्र. २* : एक जागा – ना.मा. प्रवर्ग स्त्री, एक जागा – सर्वसाधारण स्त्री, एक जागा – सर्वसाधारण
*वार्ड क्र. 3* : एक जागा – ना.मा. प्रवर्ग , एक जागा – सर्वसाधारण स्त्री, एक जागा – सर्वसाधारण
आरक्षण धोरणानुसार एकूण ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना राजकारणात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच १९ जून २०२६ ते २५ जून २०२६ या कालावधीमध्ये नागरिकांना हरकती नोंदवता येणार आहे.
ही आरक्षण सोडत ग्रामसभेत ग्रामसेवक श्री. मुसमाडे, ग्राममहसूल अधिकारी श्री. जरे, मंडलाधिकारी श्री. पवार, प्रशासक तथा सरपंच महेश शिंदे या मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी गणेश शिंदे, अभिजीत शिंदे, किशोर शिंदे, सौरभ शिंदे, रामभाऊ शिंदे (व्हा. चेअरमन), पत्रकार प्रल्हाद शिंदे यांच्यासह आदि.ग्रामस्थ उपस्थित होते.



