Breaking
ई-पेपर

*जनतेच्या विश्वासाचे नेतृत्व : अजितदादा पवार यांना त्रिमूर्ती महाविद्यालयाचे अभिवादन*

0 8 9 9 1 8

*जनतेच्या विश्वासाचे नेतृत्व : अजितदादा पवार यांना त्रिमूर्ती महाविद्यालयाचे अभिवादन*

नेवासा फाटा : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर, नेवासा फाटा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चांगदेव आरसुळे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या समन्वयिका डॉ. अनुराधा गोरे, उपप्राचार्य प्रा. निकिता बर्गे, प्रा. गोरख गुंड, प्रा. संतोष जावळे, प्रा. अश्विनी औटी, प्रा. योगिता गायकवाड, प्रा. दीपाली भोसले, प्रा. सोमनाथ खेडकर, प्रा. अनिकेत आरसुळे, प्रा. ताराचंद विधाटे, प्रा. नेहा सोनवणे, प्रा. प्रवीण आवारे, प्रा. अमृता देवकर, प्रा. देवतरसे, प्रा. वैरागर, प्रा. भवर, प्रा. कराडे, प्रा. गांगुर्डे, प्रा. पल्हारे, प्रा. वंजारे, प्रा. राव, प्रा. निकिता सोनवणे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. आरसुळे म्हणाले, “नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे, तर जनतेच्या मनात निर्माण झालेला विश्वास होय. मा. अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यक्षम नेतृत्वाने, निर्णयक्षमतेने, वक्तशीरपणाने आणि विकासाभिमुख दृष्टीकोनातून महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यातून युवकांनी शिस्त, कर्तव्यनिष्ठा, वेळेचे महत्त्व आणि लोकसेवेची प्रेरणा घ्यावी.”
उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या ग्रामीण विकास, शिक्षण, सिंचन, उद्योग, पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण आणि युवकांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा गौरव केला. विकासाला गती देणारे, जनतेशी सातत्याने संवाद साधणारे आणि प्रशासनावर प्रभावी पकड असलेले नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना समाजाभिमुख विचार, प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रहिताची जाणीव ठेवून शिक्षण घेण्याचे आवाहन करण्यात आले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे