Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

*आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याला यश; नेवासा नगरपंचायतीत संत रोहिदास भवनासाठी ₹२५ लाखांचा निधी मंजूर*

0 8 9 9 1 8

*आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याला यश; नेवासा नगरपंचायतीत संत रोहिदास भवनासाठी ₹२५ लाखांचा निधी मंजूर*

नेवासा | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत नेवासा नगरपंचायत हद्दीत संत रोहिदास भवन उभारण्यासाठी ₹२५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये संत रोहिदास भवन उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये नेवासा नगरपंचायतीचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे रोहिदास समाजासह विविध सामाजिक उपक्रमांसाठी सुसज्ज भवन उपलब्ध होणार असून, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण होणार आहे.
या कामासाठी मंजूर झालेला निधी हा नेवासा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत आमदार लंघे यांनी सांगितले की, नेवासा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक कामासाठी आपण कटिबद्ध असून, शासनाकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. सामाजिक न्याय विभागामार्फत मंजूर झालेले हे संत रोहिदास भवन समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नेवासा शहरात उभारण्यात येणाऱ्या या भवनामुळे सामाजिक ऐक्याला बळ मिळणार असून, विविध समाजोपयोगी उपक्रमांना चालना मिळेल. त्यामुळे नेवासाच्या विकासात आणखी एक महत्त्वाची भर पडणार असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे