Breaking
ई-पेपर

जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते रंगनाथ गंगाराम पंडित यांचे वृदापकाळाने निधन

0 6 0 5 1 9

नेवासा (प्रतिनिधी )- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

 

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, स्वागत मेन्स पार्लरचे मालक व ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते रंगनाथ गंगाराम पंडित यांचे रविवार दि.७ रोजी वृदापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. अतिशय मनमिळावू, शांत स्वभावाचे होते तर धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रभागी असायचे. कुकाणा व परिसरात ते अण्णा म्हणून सर्वांच्या परिचीत होते. नाभिक समाजाबरोबर विविध समाजा मध्ये विवाह जमवण्यासाठी त्यांचा मोठा सहभाग होता. तर त्यांनी शंभरहून अधिक विवाह जमवले. त्यांच्या जाण्याने नाभिक समाजाचे एक आदर्श व मार्गदर्शक व्यक्तीमत्व हरपले. त्यांना दोनदा आदर्श वृत्तपत्र विक्रेते म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले होते .
त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी सर्व क्षेत्रातील पदाधिकाऱ्या सह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, एक विवाहित मुलगी , नातवंडे , नातजावई असा मोठा परिवार होता. वृत्तपत्रे विक्रेते अनिल पंडित, भारत पंडित व पाथरवाला माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व पत्रकार सुनिल पंडित यांचे ते वडील होत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे