*महाराष्ट्र शासनाचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ जाहीर; ज्ञानेश्वर उद्योग समूहाकडून सुखदेव फुलारी यांचा गौरव*
*कामगारांच्या कर्तृत्वाचा सन्मान; ज्ञानेश्वर उद्योग समूहाने जपली गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची परंपरा*

*महाराष्ट्र शासनाचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ जाहीर; ज्ञानेश्वर उद्योग समूहाकडून सुखदेव फुलारी यांचा गौरव*
कामगारांच्या कर्तृत्वाचा सन्मान; ज्ञानेश्वर उद्योग समूहाने जपली गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची परंपरा*
नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक तथा वरिष्ठ डिस्टिलरी केमिस्ट सुखदेव फुलारी यांचा ज्ञानेश्वर उद्योग समूहाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन प्रामाणिक सेवा, तांत्रिक कौशल्य आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची ही शासनाने घेतलेली दखल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शुक्रवारी (दि. १० जुलै) कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा सत्कार सोहळा पार पडला. कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र घुले पाटील आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते श्री. फुलारी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. फुलारी यांच्या कार्याचा गौरव करताना, “गुणवंत आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचा सन्मान ही संस्थेच्या प्रगतीची खरी ओळख आहे. सुखदेव फुलारी यांनी आपल्या ज्ञान, अनुभव आणि मेहनतीच्या बळावर कारखान्याची कार्यक्षमता वाढविण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. शासनाकडून मिळालेला हा पुरस्कार संपूर्ण ज्ञानेश्वर परिवारासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, संचालक पंडितराव भोसले, अशोकराव मिसाळ, डॉ. नारायण म्हस्के, जनार्धन कदम, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अॅड. हिम्मतसिंह देशमुख, अमोल अभंग, विकास नन्नवरे, संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, काशिनाथ नवले, दत्तात्रय काळे, अशोक तानवडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, तांत्रिक सल्लागार ए. बी. खरड, एम. एस. मुरकुटे, एस. डी. चौधरी, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विशेष
कामगार कल्याण मंडळाचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ हा उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा राज्यस्तरीय सन्मान मानला जातो. सुखदेव फुलारी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने ज्ञानेश्वर उद्योग समूहासह नेवासा तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.



