Breaking
ई-पेपर

*नेवासा बाजार समितीला १ कोटी ५९ लाखांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन मंजूर*

मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या निवासाची होणार सोय.*

0 9 5 0 2 3

नेवासा बाजार समितीला १ कोटी ५९ लाखांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन मंजूर

मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या निवासाची होणार सोय.

नेवासा प्रतिनिधी –

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने १ कोटी ५९ लाख रुपये खर्चाच्या या बांधकामाला महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने मान्यता दिली आहे.
बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी तालुक्यासह परिसरातील विविध गावांमधून शेतकरी येत असतात. अनेकदा शेतमाल विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागते. अशा वेळी शेतकऱ्यांना निवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी शेतकरी भवन उभारण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या बांधकामासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येणार असून उर्वरित ५० टक्के खर्च बाजार समिती करणार आहे. प्रस्तावित शेतकरी भवनाची इमारत दुमजली असणार आहे. या भवनामुळे बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना निवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांच्या सोयी-सुविधांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, शेतकरी भवनाच्या मंजुरीमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे