
उद्यापासून शाळांचा किलबिलाट सुरू…..
पहिल्या दिवशी शाळेत मिळणार पुस्तके गणवेश…
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
दोन महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून शाळेची घंटा वाजणार आहे यंदा आमदारासह इतर लोकप्रतिनिधी शाळांना भेट देणारा असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके गणवेश देण्याचे नियोजन शाळेत ने केली आहे नवीन शैक्षणिक वर्ष 16 जून पासून सुरू होत असून जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा उदया पासून सुरू होत आहे जिल्हा परिषदेच्या शाळा सह अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश बूट व पाय मोजे देण्यात येणार असून यंदापासून याबाबतचे अधिकार पुन्हा शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रदान करण्यात आली आहे मागील वर्षी राज्य सरकारकडून जिल्हा परिषद शाळा अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशाच्या कपड्याचा पुरवठा करण्यात आला होता मात्र अनेक ठिकाणी वेळेवर गणवेशाचे कपडे उपलब्ध न झाल्याने विद्यार्थी गणवेशविशांना राहिले.
तर काही ठिकाणी गणवेशाची मापे चुकल्याने गणवेश घालता आला नाही यंदा मात्र सरकारने हा निर्णय बदलत शाळा स्तरावर असणारे व्यवस्थापन समित्यांना विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी सहा कोटी एकोणावीस लाख रुपयाचे अनुदान वर्ग केले आहे याशिवाय शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशासोबत नवीन बूट पायमोजे मिळणार आहेत .
त्यासाठी शाळा स्तरावर तीन कोटी 69 लाख रुपये अनुदान वर्ग करण्यात आली आहे या शैक्षणिक वर्षात नगर जिल्ह्यात पहिली सह अन्य वर्गातील दाखल पात्र विद्यार्थ्यांची संख्या 59 हजार 527 असून या सर्व विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेत दाखल करून घेण्यासाठी कार्यवाही होणार आहे एकही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाही यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे..
तसेच शाळेमध्ये पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.दरम्यान आठ दिवसापूर्वीच बालभारतीकडून जिल्हासाठी 23 लाख 41 हजार पाठ्यपुस्तके उपलब्धता करण्यात आली असून ती शाळा स्तरावरती वितरित करण्यात आलेली आहे सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शाळांच्या प्रवेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत होणार आहे.