पत्रकार दिना निमित्त कुकाणा येथील किड्स किंगडम विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम

पत्रकार दिना निमित्त कुकाणा येथील किड्स किंगडम विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

येथील किड्स किंगडम विद्यालयात आज पत्रकार दिनानिमित्त विध्यार्थ्यानी विविध कला, नृत्य सादर केले तर पत्रकार अनिल गर्जे, सोमनाथ कचरे, व नामदेव शिंदे यांचाही सत्कार करून गौरविण्यात आले.याप्रसंगी श्री गर्जे, कचरे, शिंदे यांची भाषणे झाली.प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत शिक्षिका अनिता बडे यांनी केले.,पायल लिंगायत ,प्रतिभा कदम पूजा पवार सुहानी पिंपळे ,पायल भालेराव आदी उपस्थित होते.प्रतिभा कदम यांनी आभार मानले. विधार्थ्यांनी तयार केलेल्या विविध भेट कार्ड यावेळी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा असलेले भेट कार्ड देण्यात आल्यानंतर भेट कार्ड तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कुकाणा येथील किड्स किंगडम विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाने पत्रकार दिन साजरा झाला.




