Breaking
ई-पेपर

*संघटनेच्या हितासाठी पदाधिकाऱ्यांनी आचारसंहिता पाळून कार्यरत राहावे : कुमार पाटील*

0 8 9 9 9 2

*संघटनेच्या हितासाठी पदाधिकाऱ्यांनी आचारसंहिता पाळून कार्यरत राहावे : कुमार पाटील*

नेवासा प्रतिनिधी :

संघटनेचे प्रतिनिधित्व करताना प्रत्येक पदाधिकाऱ्याने आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. संघटनेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहून संघटनेला बळ दिल्यास सर्व सदस्यांना सहकार्य करून त् यांच्या प्रश्नांना न्याय देता येईल, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा क्लिनिकल लॅब असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष कुमार पाटील यांनी केले.

नेवासा तालुका क्लिनिकल लॅब असोसिएशनच्या वतीने केंद्र शासनाचा NCAHP व CEA Act तसेच महाराष्ट्र शासनाचे आस्थापना विधेयक ५१/२६ या विषयावर संवाद व चर्चा बैठकीचे आयोजन हॉटेल स्वागत, भेंडा येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना कुमार पाटील बोलत होते.

यावेळी कुमार पाटील यांनी क्लिनिकल लॅब क्षेत्राशी संबंधित कायदेशीर बाबी, संघटनेचे ध्येय-धोरण, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी तसेच सदस्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने काम करण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
*आर्ले पाटील अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. कुकाणा या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश आर्ले पाटील यांचे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यासाठी त्यांनी आर्ले पाटील अर्बन पतसंस्थेच्या वतीने यापूर्वी ३०० पेक्षा जास्त आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना विनातारणी कर्ज देऊन त्यांच्या आर्थिक अडचणी दूर केल्या तसेच आता नेवासा लॅब असोसिएशनच्या सदस्यांना देखील कर्ज तसेच बचतीच्या विविध सुविधा उपलब्ध करण्याचे त्यांनी नमूद केले*

कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग काकडे, सचिव राजेश गुंजाळ, खजिनदार अनिल पहारे, तालुका अध्यक्ष संजय कर्जुले, डॉ. गणेश आर्ले पाटील, गणेश आवारे, माजी सरपंच गणेश गव्हाणे, नामदेव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करत संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत मनोगत व्यक्त केले.

नेवासा तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर

यावेळी जिल्हाध्यक्ष कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुका क्लिनिकल लॅब असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास नेवासा तालुक्यातील क्लिनिकल लॅब असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बालगुडे सर, मुस्तफा कादरी, विजय म्हस्के, कैलास काळे, शुभम नवले, जालिंदर गोरे, प्रवीण शिंदे, रवी काळे, गणेश दरंदले, सौ. दीपा काळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आर्ले पाटील संस्थेच्या सौजन्याने स्नेहभोजन

या कार्यक्रमास आर्ले पाटील को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे सौजन्य लाभले. कार्यक्रमानंतर आर्ले पाटील हेल्थ केअर व आर्ले पाटील क्रेडिट सोसायटीच्या वतीने उपस्थित पदाधिकारी व सदस्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे कार्यक्रमाला आपुलकीच्या वातावरणाची जोड मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ कचरे यांनी केले, तर कैलास काळे यांनी आभार मानले.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे