Breaking
ई-पेपर

अन्वरवली बाबा, चंदू बाबा ,गुलजार बाबा  यांच्या उरसाची जळका खुर्द ग्रामस्थांकडून जय्यत तयारी…..

0 6 0 5 2 1

अन्वरवली बाबा, चंदू बाबा ,गुलजार बाबा  यांच्या उरसाची जळका खुर्द ग्रामस्थांकडून जय्यत तयारी…..

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा अहिल्यनगर

अन्वर वली बाबा चंदू बाबा गुलजार बाबा यांचा भव्य उरूस जळका खुर्दमध्ये येत्या रविवारी दिनांक ३०/०३/२०२५ ते मंगळवार दिनांक०१/०४/२०२५ या कालखंडामध्ये संपन्न होणार आहे.

जळका ग्रामस्थांच्या वतीने  प्रसिद्ध परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे की अन्वर वली बाबा ,चंदू बाबा, गुलजार बाबा ,यांचा भव्य दिव्य उरूस येत्या रविवारी, सोमवारी, मंगळवारी या कालखंडामध्ये संपन्न होणार आहे या उरुसाचे ठिकाण म्हणून अन्वरवली बाबा दर्गा जळका खुर्द हे असून .

या भव्य ऊरसा मध्ये पहिल्या दिवशी ३०/०३/२०२५ रोजी व रविवार रात्री९ ते ११ या वेळेमध्ये संदल व शोभेची दारू असा कार्यक्रम संपन्न होणार आहे  तसेच सोमवार दिनांक ३१/०३/२०२५ रोजी रात्री ९ ते ११ या वेळेमध्ये छबिना संपन्न होणार आहे .तसेच मंगळवार दिनांक०१/०४/२०२५ रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळामध्ये बजरंग बली शेरनी वाटप व महापूजाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

तरी या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन समस्त भक्तगण अन्वर वली बाबा, चंदू बाबा ,गुलजार बाबा व समस्त भक्तगण व समस्त गावकरी जळके खुर्द यांच्या वतीने  भव्यदिव्य नियोजन करण्यात आले आहे.

हा उरुस दरवर्षी जळका खुर्द या गावांमध्ये भरवला जातो तरी जास्तीत जास्त भाविकांनी या उरसाचा लाभ घेण्याच्या आवाहन समस्त जळका खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे

4/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे