Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपर

*शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*

0 9 5 0 2 3

*शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*

शिरसगाव | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार (दि. २८ जून २०२६) रोजी पाच वर्षांखालील बालकांसाठी आयोजित लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने पालकांनी आपल्या चिमुकल्यांना पोलिओ लसीकरणासाठी आणत मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य विभागाने सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरणाची व्यवस्था केली असून, कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नवजात बालकांनाही पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.
यावेळी आरोग्य निरीक्षक धर्मनाथ पालवे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “पोलिओ हा गंभीर विषाणूजन्य आजार असला तरी वेळेवर लसीकरण केल्यास तो पूर्णपणे टाळता येतो. भारताने पोलिओमुक्त देशाचा मान मिळविला असला, तरी जगातील काही भागांत अद्याप पोलिओची प्रकरणे आढळत आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत.”


यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले, “बालकांचे निरोगी भविष्य घडविण्यासाठी पोलिओ लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलिओमुळे कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पालकाने कोणतीही हयगय न करता आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत. पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आरोग्य विभागाला सहकार्य करणे ही काळाची गरज आहे.”
यावेळी पत्रकार मंगेश निकम यांनी शासनाच्या या जनहिताच्या मोहिमेचे स्वागत करत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. जनजागृती आणि शंभर टक्के लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सातत्याने परिश्रम घेत असून, या मोहिमेमुळे भविष्यातही देश पोलिओमुक्त राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी भागवत दहिफळे, शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा देवरे, नवनाथ साळुंखे, हर्षद देशमुख, सोमनाथ आसने, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“दोन थेंब प्रत्येक वेळी… पोलिओमुक्त भारतासाठी प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचवूया,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे