Breaking
ई-पेपर

शरणपूर वृद्धाश्रमात ठोंबरे कुटुंबीया कडुन मिष्टान्न भोजन.

0 8 9 9 4 3

शरणपूर वृद्धाश्रमात ठोंबरे कुटुंबीया कडुन मिष्टान्न भोजन.

प्रतिनिधी मोहन शेगर सोनई- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

घोडेगाव कै बक्षु ठोंबरे यांच्या प्रथम पुम्यस्मरणाचे निमित्ताने येथील भाऊसाहेब ठोंबरे व संगीता ठोंबरे यांनी फत्तेपूर येथील शरणपूर वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन दिले.
यावेळी ठोंबरे कुटुंबा सोबत रमेश जाधव, शिवाजी ईखे, प्रदीप काळे, कैलास शिंदे,भाऊसाहेब काळे (मामा) पत्रकार दिलीप शिंदे उपस्थित होते.
वृद्धाश्रम मधील गरज लक्षात घेता दिलीप शिंदे यांनी मार्शल कंपनीची चौदा ईंची सिंगल फेज पिठाची गिरणी आई वडिल कै एकनाथ शिंदे व कै रुख्मिणी शिंदे यांचे स्मरणार्थ देऊ केली.
अक्षय ग्रामीण युवा क्रिडा व सामाजिक प्रतिष्ठान संचलित ” शरणपूर वृद्धाश्रम” अध्यक्ष रावसाहेब मगर हे चालवतात. या वृद्धाश्रमात बाविस स्त्रीया तर आठ पुरुष आहे. कोणत्याही शासकीय अनुदाना शिवाय हा वृद्धाश्रम लोकांनी दिलेल्या देणगी वर चालत आहे.या अगोदर नेवासा फाटा ,मुकिंदपुर येथे दुस-याच्या जागेत चालवत होतो. आता स्वतःच्या जागेत हा वृद्धाश्रम चालु केल्याचे रावसाहेब मगर यांनी सांगितले.
पत्र्याच्या शेड उभारुन दहा खोल्या तयार केल्या आहेत.तेथेच वृद्धासह स्वतः रावसाहेब मगर व पत्नी स. राहत आहेत तर पुतणे आणखी सुनबाई काळजी वाहक म्हणुन सेवा देत आहेत.
वृद्धांना सांभाळणे तसं जिकिरीचे काम. त्यांना लहान मुलाप्रमाणे सांभाळावे लागते. त्यांचे खाणे पिणे, कपडालत्ता बरोबरच आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. आणी यासाठी मी फक्त माधृयम आहे. येथे देणगी देणारे हात पुढे येतात त्यांच्याच सहकार्याने मदतीने हा वृद्धाश्रम चालत आहे.
वृद्धाश्रम साठी एक एकर जागा आहे .त्या आम्ही येथे लागणारा भाजी पाला घेत आहोत . रस्त्यांची अडचण आहे. भराव केला .येथे मुरुम खडीकरण गरजेचे आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल होतो. वाहने आत येत नाही. वृद्धांना पायी चालणं कठिण होत .रस्त्यांसाठी दात्याचे हात पुढे यावे अशी अपेक्षा वृद्धाश्रमाचे वतीने करण्यात आली.

आपण हि आपल्या प्रियजनाच्या आठवणी जागवण्यासाठी येथे या. आजी आजोबा बरोबर गप्पा मारा आपलं आणी त्यांच सुख दुःख हलकं करा. असे आवाहन रावसाहेब मगर यांनी केले आहे.
भाऊसाहेब ठोंबरे कुटुंबांचा यावेळी वृद्धाश्रमाचे वतीने शाल श्रीफळ देऊन बाळासाहेब मुटकुळे सन्मान केला.तर अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी पुन्हा येण्या चे आवाहन करत आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे