Breaking
ई-पेपर

नेवासा बाजार समितीत ६ मे पासून खुल्या कांदा खरेदी-विक्रीला सुरुवात.

शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार; स्थानिक अर्थकारणाला मिळणार चालना.

0 8 9 9 1 9

नेवासा बाजार समितीत ६ मे पासून खुल्या कांदा खरेदी-विक्रीला सुरुवात.

शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार; स्थानिक अर्थकारणाला मिळणार चालना.

नेवासा, प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा बाजार समिती येथे बुधवार, दि. ६ मे रोजी सकाळी 9 वाजता खुल्या कांदा खरेदी-विक्रीचा शुभारंभ होणार असून, या उपक्रमामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) व महंत वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते व बाजार समितीचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
नेवासा बाजार समितीत आठवड्यातील प्रत्येक मंगळवार व गुरुवार या दिवशी खुल्या कांदा लिलावाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी नेवासा येथे आणावा, असे आवाहन सभापती नंदकुमार पाटील यांनी केले आहे.
घोडेगाव येथील कांदा गोणी मार्केटला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथेही खुल्या कांदा खरेदी-विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कांद्याची काढणी सुरू असताना योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी जागेवरच माल विक्री करत आहेत. मात्र, अशा शेतकऱ्यांनी खुल्या लिलावासाठी नेवासा बाजार समितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नेवासा, भालगाव, गोधेगाव, प्रवरासंगम, सलाबतपूर, जळके, वरखेड, रामडोह, गोगलगाव,गळनिंब,मुरमे,सुरेगाव गंगा, सुरेगाव दही, देडगाव, पाचेगाव, पुनतगाव, खुपटी, बेलपिंपळगाव, बेलपांढरी तसेच नेवासा बु परिसरासह नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नेवासा येथे खुल्या कांदा विक्रीस सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना बाहेरगावी जाऊन विक्री करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. तसेच, कांदा विक्रीनंतर शेतकऱ्यांना तत्काळ काटा-पट्टी पेमेंट मिळणार असल्याने आर्थिक व्यवहार सुलभ होणार आहेत.
या नव्या उपक्रमामुळे नेवासा शहरातील बाजारपेठेला चालना मिळून स्थानिक अर्थकारण अधिक बळकट होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे