*आर्ले हेल्थ केअर अँड ऑप्टिकल्समध्ये दर महिन्याच्या २५ तारखेला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर!*

*आर्ले हेल्थ केअर अँड ऑप्टिकल्समध्ये दर महिन्याच्या २५ तारखेला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर!*
बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम; अल्प दरात चष्मे, कॉन्टॅक्ट लेन्स व विविध नेत्रविकारांवर उपचारांची सुविधा
नेवासा | महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
डोळे हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असून, डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कुकाणा येथील आर्ले हेल्थ केअर अँड ऑप्टिकल्स यांच्या वतीने बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या २५ तारखेला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

या शिबिरामध्ये संगणकाद्वारे नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व उपचार, स्लिट लॅम्प तपासणी, रेटिना अर्थात नेत्रपटल तपासणी, काचबिंदू तपासणी व उपचार, दृष्टिदोष तपासणी तसेच इतर विविध नेत्रविकारांबाबत मार्गदर्शन आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळणार असून, अत्यल्प दरात फेको लेसर तंत्रज्ञानाद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच अल्प दरात ब्रँडेड चष्मे व कॉन्टॅक्ट लेन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
बुधराणी हॉस्पिटल, पुणे येथील नेत्ररोग तज्ज्ञांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे कुकाणा व परिसरातील नागरिकांना नेत्रतपासणी आणि उपचारांसाठी पुण्याला जाण्याची गरज कमी होऊन स्थानिक पातळीवर मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे. विशेषतः वयोवृद्ध नागरिक, मोतीबिंदूचा त्रास असलेले रुग्ण आणि आर्थिकदृष्ट्या गरजू व्यक्तींसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
शिबिरासाठी येताना नागरिकांनी आधारकार्ड, रेशनकार्ड यांच्या झेरॉक्स प्रती, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक सोबत आणावा. भारतीय विमा, प्रवास, जेवण, औषधे आणि दोन दिवस राहण्याच्या सोयीसाठी शिबिरामध्ये येणाऱ्या रुग्णांकडून ७०० रुपये शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आर्ले हेल्थ केअर अँड ऑप्टिकल्स, कुकाणा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे या उपक्रमाची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२०३३५८२४ / ९६२३७१३०१५.
डोळ्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून घ्यावी आणि या शिबिराचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आर्ले हेल्थ केअर अँड ऑप्टिकल्सच्या वतीने करण्यात आले आहे.




