*नेवासा तालुक्यातील पत्रकारितेला दीनमित्रकारांच्या विचारांचा वारसा- :गणेश महाराज चौधरी.

नागेबाबा पतसंस्थेकडून पत्रकारांचा सन्मान….
*नेवासा तालुक्यातील पत्रकारितेला दीनमित्रकारांच्या विचारांचा वारसा-गणेश महाराज चौधरी*
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
पत्रकार हा समाज व्यवस्थेचा एक अतिशय महत्त्वाचा स्तंभ आहे. अन्याय होवून ही त्याकडे इतरांचे दुर्लक्ष होत असले तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम पत्रकाराची लेखणी करू शकते. नेवासा तालुक्यातील पत्रकारितेला दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या विचारांचा वारसा आहे असे प्रतिपादन गणेश महाराज चौधरी
यांनी केले.
नागेबाबा पतसंस्थेच्या भेंडा शाखेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून भेंडा परिसरातील पत्रकार सुखदेव फुलारी,कारभारी गरड,बाळकृष्ण पुरोहित,नामदेव शिंदे, रमेश पाडळे, संतोष सोनवणे, अशोक पंडित, संतोष औताडे,सतीष फुलारी, युसुफ सय्यद,अशोक पेहरकर आदि पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
नागेबाबा पतसंस्थेचे माजी संचालक गणपतराव गव्हाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमाला आबासाहेब काळे, अजित रसाळ,सुभाष चौधरी, सुभाष औटी,राजेंद्र नवले,वाल्मीक लिंगायत, गोंडेगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक – संदिप फुलारी, अजित रसाळ,
नागेबाबाचे क्षेत्रीय विकास अधिकारी कन्हैय्या काळे, मोहन वाघडकर,शाखाधिकारी राणी राजगुरू,आरती जैन
लक्ष्मण थोरात,सानिया शेख, कामिनी बोरुडे, सायली कोळगे, किरण पांढरे, राम सुसे,बाळासाहेब शिंदे, सुधाकर गायकवाड आदी उपस्थित होते.
*पत्रकार कारभारी गरड* म्हणाले, कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेबाबा पतसंस्था दरवर्षी पत्रकारांच्या सन्मानाचा उपक्रम करते त्याबद्दल आम्ही सर्वच ऋणी आहोत.
पत्रकारिता हे सावित्रीचे वाण आहे.
पत्रकारांना अडचणीत आणणारे खूप लोक आहेत.आमच्या चुकीचे समर्थक मुळीच करू नका,परंतु अडचणीच्या काळात समाजाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे.
*प्रा.संतोष सोनवणे* म्हणाले की, राज्यभर पत्रकराचा सन्मान करणारी नागेबाबा ही एकमेव संस्था आहे. दीनमित्रकारांच्या विचारांचा वारसापुढे चलविण्याचा आम्ही पर्यंत करू.
राजेंद्र चिंधे यांनी प्रस्ताविक केले.नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक दिलदार शेख यांनी सूत्रसंचालन केले. नागेबाबा मल्टीस्टेटचे शाखा व्यवस्थापक संतोष साप्ते यांनी आभार मानले




