शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी स्वामी समर्थ शुगर इंडस्ट्रीज माळेवाडी दुमला ३०५० रुपये जाहीर केला भाव…… कारखान्याचे अध्यक्ष मंत्री विजय बापू शिवतारे यांची घोषणा…..
शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी स्वामी समर्थ शुगर इंडस्ट्रीज माळेवाडी दुमला ३०५० रुपये जाहीर केला भाव…… कारखान्याचे अध्यक्ष मंत्री विजय बापू शिवतारे यांची घोषणा…..
नेवासा -महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांची काम देधेनु म्हणून नवीनच सुरू झालेला दुसऱ्या गळीत हंगामाचा प्रारंभ २९-१०-२०२५ रोजी मूळी टाकून शुभारंभ करण्यात आला.
त्याच धर्तीवरती आज कारखान्याचे चेअरमन तसेच माजी मंत्री विजय बाप्पु शिवतारे यांनी आज शेतकऱ्यासाठी आनंदाची बाब म्हणून शेतकऱ्याच्या ऊसासाठी तीन हजार पन्नास रुपये(३०५०) भाव जाहीर केला असून तसेच त्यांनी यावेळी बोलताना सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वामी समर्थ शुगर इंडस्ट्रीज माळेवाडी या आपल्या कामधेनू असलेल्या कारखान्याला जास्तीत जास्त प्रमाणात ऊस पोहच करावा असे आवाहन तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना आमदार माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे तसेच ते पुढे बोलताना म्हणाले भावा व्यतिरिक्तही इतरत्र सुविधा शेतकऱ्यांना कारखान्याच्या माध्यमातून दिल्या जातील असे माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष विजय शिवतारे यांनी बोलताना सांगितले.




