Breaking
ई-पेपर

आकाश मीना कैलास भारस्कर यांचा तरवडी गावामध्ये भव्य नागरी सन्मान..

0 6 0 5 1 9

केंद्रीय पोलीस दल दिल्ली येथे उपनिरीक्षक पदी निवड झाल्या बद्दल तालुक्याच्या वतीने तसेच जन्मभूमी गाव तरुडीकरांच्या वतीने आकाश मीना कैलास भारस्कर यांचा तरवडी गावामध्ये भव्य मिरवणूक काढत ग्रामस्थांनी केला सन्मान सन्मानाला राजकीय धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती…..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील भूमिपुत्र म्हणून ओळखले जाणारे तरवडी गावचे सुपुत्र आकाश कैलास भारस्कर यांचा आज ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य सन्मान करण्यात आला .

या सन्मान कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैय्यासाहेब देशमुख हे होते तसेच मंचावरती आ. विठ्ठलराव लंघे पाटील,काशिनाथ अण्णा नवले, दौलत अण्णा देशमुख, अमोल अभंग, अब्दुल शेख, सोमनाथ कचरे, सुखदेव फुलारी,पोपटराव सरोदे, किशोर मिसाळ सिद्धार्थ कावरे ,बाळासाहेब आल्हाट, प्राचार्य नवले सर, अशोकराव क्षीरसागर ,बाळासाहेब तात्या, मनोहर बोराटे ,शिवाजी महाशिकारे, बंडू पाटील, अरविंद देशमुख, सातपुते ,गुरुजी जनार्दन, भालेराव देवा, डॉक्टर स्वाती कैलास भारस्कर, साईमनराव भारस्कर, विलास भारस्कर ,दत्तात्रय भारस्कर, देविदास भारस्कर ,शंकर उमाप, बाबासाहेब बोरुडे, भाऊसाहेब दरवडे संजय खेडेकर, नंदू भारस्कर, राजू भारस्कर ,शिवाजी भारस्कर, पांडुरंग भारस्कर ,गोविंद भारस्कर, सचिन शिरसागर ,आराधना बोरुडे, मोनिका गोल्हार, सोनाली घोरपडे, दत्तात्रेय विधाटे, सोपान शिरसागर, जमाली सय्यद, राहुल जावळे, अशोक क्षीरसागर, दत्तात्रय क्षीरसागर, सुखदेव फुलारी, सोमनाथ कचरे ,सचिन शिरसागर , बाबासाहेब नाईक, संपतराव शिंदे, भाऊसाहेब दरवडे, बाबासाहेब घुले, उत्तमराव भारस्कर, प्रदीप भारस्कर, सुनील भारस्कर, सचिन दरवडे, संतोष उमाप, शंकरराव कनेरकर, अरविंद भारस्कर, बाबासाहेब बोरुडे, अनिल भारस्कर, बापूसाहेब भखरस्कर, प्रकाश भारस्कर, मधुकर वैरागर, केसरकर सर, बाळासाहेब सरोदे, आदी तरवडी ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आकाश यांचे वडील कैलास भारस्कर हे बोलताना म्हणाले की तरवडी गाव हे पूर्वी वेगळे नावाने ओळखले जायचे आता या मुलांनी हे नाव नावलौकिक केले असून या तरवडी गावामध्ये दोन पी.एस.आय तीन मेजर आहेत असे अनेक क्षेत्रांमध्ये या गावातील मुले आहेत या माध्यमातून गावाचे नाव उज्वल केले आहे आकाश याच्या रूपाने तरवडी गाव हे दिल्लीपर्यंत पोहोचले असल्याचे वडील या नात्याने आपल्या भावना त्यांनी बोलताना व्यक्त केल्या तसेच आकाशचे त्यांनी या यशा बद्दल अभिनंदन केेले.

यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाले की आकाशच्या निवडीने आपल्या तालुक्याचा ही सन्मान व बहुमान यांच्या निवडीमुळे झालेला आहे तसेच तालुक्याची मान उंचावली आहे मी भारस्कर कुटुंबियांना धन्यवाद देतो की आपण चांगली सुशिक्षित पिढी आपल्या मार्गदर्शनाखाली तयार झाली तसेच आपण उच्च पदावर आज गेला आहात त्या पदाचा उपयोग तालुक्यातील ग्रामीण भागातील युवक युवतींना या आपल्या पदाच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे व आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बारावीनंतर काय केले पाहिजे याचेही मार्गदर्शन आपण केले पाहिजे आपल्यासारख्या स्वकर्तृत्वावर पुढे गेलेल्या तरुणांनी तालुक्यातील युवा पिढी घडवण्याचे काम पुढील काळामध्ये हाती घ्यावी असे आमदार लंघे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी एडवोकेट देसाई आबा देशमुख, काशिनाथ अण्णा नवले, अब्दुलभाई शेख, वडील कैलास भारस्कर, यांनी आपली मनोगत व्यक्त केले तसेच चिरंजीव आकाश यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी तरवडी व तरवडी परिसरातील नागरिकांनी तसेच महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे