‘एक पेड माॅं के नाम’ अंतर्गत ज्ञानेश्वर कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण*

*’एक पेड माॅं के नाम’ अंतर्गत ज्ञानेश्वर कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण*
भेंडा(वार्ताहर):– महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ निमित्त “एक पेड माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण
करण्यात आले.
देशातील सर्व विभाग, स्वयंसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी होऊन भारताच्या १४० कोटी लोकसंख्ये एवढीच झाडे लागावी, याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माॅं के नाम’ याला वृक्ष रोपणाशी जोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सहकार मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ दरम्यान “एक पेड माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे.देशातील सर्व सहकारी संस्था आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना सहभागी करून “एक पेड माँ के नाम आणि प्लांट फॉर माँ” अंतर्गत वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेचा भाग म्हणून लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग व जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संचालक काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ, शिवाजी कोलते,दादा गंडाळ, विष्णू जगदाळे, बबनराव भुसारी, नारायण म्हस्के, विकास नन्नवरे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रविंद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजीराव माळवदे, अण्णासाहेब गर्जे, आप्पासाहेब खरड, सुरेश आहेर, राहुल पाटील,बबनराव धस,गणेश गव्हाणे, नामदेव निकम, कल्याणराव म्हस्के, बाळासाहेब डोहाळे,विलासराव लोखंडे, रामभाऊ पाऊलबुद्धे, सुनील देशमुख,
सचिन निकम,रोहित मोटे, ज्ञानेश्वर आरगडे, डॉ. बाळासाहेब देवकर, भाऊसाहेब सामृत,पोपट उगले, राजेंद्र शिंदे, चांगदेव जगताप, रमेश मते, आदी यावेळी उपस्थित होते.




