Breaking
ई-पेपरराजकिय

आ. लंघे पाटील यांचज कट्टर समर्थ आदिनाथ निकम यांची भेंडा गणातून पंचायत समिती उमेदवारी करावी यासाठी जनतेतून मागणीचा जोर वाढला….

0 6 0 5 0 7

आ. लंघे पाटील यांचज कट्टर समर्थ आदिनाथ निकम यांची भेंडा गणातून पंचायत समिती उमेदवारी करावी यासाठी जनतेतून मागणीचा जोर वाढला….

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृतसेवा

नेवासा तालुक्यातील होऊ घातलेले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या माध्यमातून अनेक उमेदवार वेगवेगळे गटामधून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु भेंडागटाचे चित्र पाहता दिघी येथील रहिवासी असलेले तसेच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे जुने कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले दिघी ग्रामपंचायतचे सदस्य आदिनाथ निकम यांनी भेंडा गणातून निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आदिनाथ निकम हे दिघे ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून चांगल्या मताधिक्याने निवडून आले तसेच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे त्यांनी दिघे गावांमध्ये घडवून आणले.

तसेच आमदार लंघे यांच्याशी त्यांची स्नेहाचे संबंध असून आमदार लंघे पाटील यांच्या वतीने त्यांना भेंडा गणातून पंचायत समिती सदस्य उमेदवारी करणे संदर्भात अग्रह होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे तशी तयारीही त्यांनी भेंडा गणामध्ये जोरदार सुरू केली आहे.

भेंडा गणामध्ये दिघी, भेंडा ,देवगाव ,चिंचोली, शहापूर,गाव तसेच गणामधील सर्वत्र गावामध्ये ते सध्या भेटीगाठीचा दौरा करून सर्वांच्या सुखदुःखामध्ये शुभ कार्य असतील यामध्ये आवर्जून उपस्थिती दर्शवताना पहावयास मिळत आहे.

तरी भेंडा गणामध्ये दिग्गज राजकारणी पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे चर्चा तालुक्यामध्ये होताना पाहावयास मिळत आहे भेंडा गटात मोठा राजकीय वलय असलेला गट म्हणून मानला जातो मोठे दिग्गज नेते या गटामध्ये प्रस्थापित आहेत त्यामध्ये कारखान्याचे संचालक असतील सरपंच, उपसरपंच, यापूर्वी ज्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवून विजय मिळवलेले उमेदवार असतील तसेच नवे जोमाचे ही उमेदवार या गटांमध्ये सध्याला चर्चेमध्ये पहावयास मिळत आहेत त्यातल्या त्यातच हे नवे उमेदवार म्हणून दिघी गावचे सुपुत्र आदिनाथ निकम यांची चर्चा गणामध्ये उमेदवारी मिळावी यासाठी जोर धरू लागली
आहे. तरी उमेदवारीचे चित्र पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.

2.5/5 - (2 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे