Breaking
ई-पेपर

*टाळ-मृदंगाच्या गजरात सुरेगाव दही येथून पंढरपूर पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान*

*महिला-पुरुष वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गावभर भक्तिमय वातावरण*

0 9 5 0 2 3

*टाळ-मृदंगाच्या गजरात सुरेगाव दही येथून पंढरपूर पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान*
*महिला-पुरुष वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गावभर भक्तिमय वातावरण*

*नेवासा प्रतिनिधी | महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा*

नेवासा तालुक्यातील **मौजे सुरेगाव दही येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडी सोहळ्याचे रविवारी सकाळी आठ वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “राम कृष्ण हरी”, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड नामघोषात उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. शेकडो वारकरी, ग्रामस्थ, महिला-भगिनी, युवक-युवती आणि भजनी मंडळांच्या उपस्थितीने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.


दिंडी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या दिंडीचे हे दुसरे वर्ष असून वारकरी परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीदरम्यान दररोज पहाटे सकाळी ४ ते ६ या वेळेत काकड आरती व भजन, तसेच सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ आयोजित करण्यात येणार आहे.
दिंडी प्रस्थान सोहळ्यास ह.भ.प. रमेशानंदगिरीजी महाराज (हांडीनिमगाव, त्रिवेणी देवस्थान, सुरेशनगर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “दिंडी ही केवळ पायी यात्रा नसून भक्ती, सेवा आणि समाजएकतेचा महोत्सव आहे. सर्व ग्रामस्थांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हावे आणि पांडुरंगाच्या भेटीस आनंदाने मार्गक्रमण करावे.”
यावेळी सुरेगावचे भूमिपुत्र तथा पोलीस निरीक्षक योगेश गंगणे यांनीही दिंडीस विशेष सहकार्य केले.
दिंडी प्रस्थानावेळी महिला-भगिनींनी पारंपरिक फुगड्या खेळत विठ्ठल नामाचा अखंड गजर केला, तर पुरुष वारकऱ्यांनीही “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गावभर प्रदक्षिणा घालत भक्तिमय वातावरणात दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
या सोहळ्यात सुरेगाव दही येथील ग्रामस्थ, महिला भजनी मंडळ, विविध भजनी मंडळे, युवक-युवती तसेच शेकडो वारकरी मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने सहभागी झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे