Breaking
ई-पेपर

*रयत क्रांती संघटनेच्या युवा आघाडी जिल्हाध्यक्षपदी पंढरीनाथ कोतकर; संदीप गवारे यांची जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती*

0 9 5 0 2 3

*रयत क्रांती संघटनेच्या युवा आघाडी जिल्हाध्यक्षपदी पंढरीनाथ कोतकर; संदीप गवारे यांची जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती*

नेवासा प्रतिनिधी :

रयत क्रांती संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नेवासा तालुक्यातील बाबुळवेढा येथील पंढरीनाथ हनुमंत कोतकर यांची, तर अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी संदीप रावसाहेब गवारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या नियुक्तीपत्राद्वारे या निवडी जाहीर करण्यात आल्या.

पंढरीनाथ कोतकर हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक व संघटनात्मक चळवळींमध्ये सक्रिय असून, शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या, दूध उत्पादकांच्या अडचणी तसेच शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने आणि उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सहभाग नोंदविला आहे.

संदीप गवारे यांनीही नेवासा तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात विविध सामाजिक व संघटनात्मक प्रश्नांवर काम केले आहे. शेतकरी, शेतमजूर आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांसह सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनात्मक पातळीवर त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.

दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत रयत क्रांती संघटनेने त्यांच्यावर जिल्हास्तरीय जबाबदारी सोपविली आहे. संघटनेची ध्येयधोरणे आणि नियमांचे पालन करून दिलेली जबाबदारी निष्ठा, सचोटी व समर्पणाने पार पाडावी तसेच संघटनेची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, पंढरीनाथ कोतकर आणि संदीप गवारे यांच्या नियुक्तीचे नेवासा तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध स्तरांतून स्वागत होत असून, कार्यकर्ते, पदाधिकारी व मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात शेतकरी, शेतमजूर व दूध उत्पादकांच्या प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठावर अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी या दोन्ही नियुक्त्या महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

4/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे