Breaking
ई-पेपर

नवले परिवाराकडून चिलेखनवाडी शाळेत दत्तक विद्यार्थ्यांना कपडे व शालेय साहित्य वाटप..

0 6 0 5 0 7

*नवले परिवाराकडून चिलेखनवाडी शाळेत दत्तक विद्यार्थ्यांना कपडे व शालेय साहित्य वाटप..

नेवासा प्रतिनिधी-  महाराष्ट्र 7न्यूज वृत्सेवा

चिलेखनवाडी शाळेत इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी दत्ताशेठ नवले परिवार भानसहिवरे यांच्याकडून शाळेतील ५ गरजू विद्यार्थ्यांना कपडे व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच नाथा महाराज गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना गोड जेवण दिले. यापूर्वीही दत्ता शेठ नवले यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गोड जेवण दिले होते. याबद्दल दत्ताशेठ नवले व नाथा महाराज गुंजाळ यांचा शाळेच्या व गावाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब सावंत सर, विकास कांबळे, नवनाथ गुंजाळ, नाथा महाराज गुंजाळ, शिक्षक भाऊसाहेब चंदन हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश सानप यांनी केले. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. भाऊसाहेब सावंत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सविता श्रीमंदिलकर यांनी केले व शिक्षक विरेश नवगिरे यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे