*दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन*
*दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन*
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या
भारतातील पहिले ग्रामिण पत्रकार
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी
सत्यशोधकीय व प्रागतिक विचारांचा प्रसार करणारे ग्रंथ पाठविण्याचे आवाहन समितीचे सचिव उत्तमराव पाटील यांनी केले आहे.
अधिक माहिती देताना श्री.पाटील म्हणाले की,दरवर्षी दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी २० डिसेंबर रोजी महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांची कास धरणाऱ्या कथा, कांदबरी, कवीता संग्रह, संशोधनपर प्रकाशित साहित्याचा विचार केला जातो.सत्यशोधकीय, प्रागतिक विचारांचा प्रसार करणाऱ्या ग्रंथांसाठी विविध पुरस्कार दिले जातात.
त्यासाठी १ जानेवारी २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रकाशित साहित्याच्या दोन प्रती, लेखक परिचय व दोन पासपोर्ट फोटो दि. ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत
श्री.उत्तमराव पाटील, सचिव, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती, तरवडी ता. नेवासा जि. अहमदनगर (दूरध्वनी क्रमांक ९८२२८२२०९५) या पत्त्यावर पाठवाव्यात.




