Breaking
ई-पेपर

आ. लंघेच्या मतदारसंघात सभापती शिंदे, मंत्री विखेंचा आज सन्मान.

0 6 0 5 1 9

आ. लंघेच्या मतदारसंघात सभापती शिंदे, मंत्री विखेंचा आज सन्मान

नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

राज्याचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदाांचा सत्कार समारंभ व नेवासा मतदारसंघाचे शिवसेनेचे आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वतीने तालुक्यातील मतदारांचे जाहीर आभार व नवनिर्वाचित आमदार व नामदार यांचा जाहीर सत्कार समारंभ रविवार (दि.५) रोजी दुपारी १२ वाजता आराध्या मंगल कार्यालयात आयोजित केला असल्याची माहिती कार्यक्रमाचे
अध्यक्ष पंचगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रभाकर (काका) शिंदे यांनी दिली.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ना. राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील महायुतीचे आ. शिवाजीराव कर्डिले, संग्राम जगताप, डॉ. किरण लहामटे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, विठ्ठलराव लंघे पाटील, अमोल खताळ, काशिनाथ दाते, विक्रमसिंह पाचपुते तसेच भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आदी मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे