Breaking
ई-पेपर

घोडेगावात कांदा ३०० ते १५०० रुपये

0 6 0 5 0 7

घोडेगावात कांदा ३०० ते १५०० रुपये

नेवासा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी – एक हजार रुपयांची घसरण झाल्यानंतर काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणखी १०० रुपयांची घसरण होवून जास्तीत जास्त भाव १५०० रुपयांपर्यंत निघाले.अचानक २६०० रुपयांवरुन १५०० रुपयांपर्यंत कांदा भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. घोडेगाव कांदा मार्केटमध्ये नवीन उन्हाळी कांद्याची आवक अपवादानेच होत आहे. अद्यापही आवक होणारा कांदा, हा लाल कांदाच आहे.
काल एक नंबरच्या कांद्याला १४०० ते १५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. दोन नंबरला १३०० ते १४०० रुपये, तीन नंबरच्या कांद्याला १२०० ते १३०० रुपये भाव मिळाला. गोल्टा कांद्याला १००० ते १३०० रुपये, गोल्टी कांद्याला ८०० ते १००० रुपये तर जोड, हलक्या व डॅमेज कांद्याला ३००. ते ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. अपवादात्मक भाव १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत निघाला.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे