*अब्दुल भैय्या शेख यांच्या संकल्पनेतून कुकाणा येथे जनता दरबाराचे आयोजन…
*अब्दुल भैय्या शेख यांच्या संकल्पनेतून कुकाणा येथे जनता दरबाराचे आयोजन…

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील कुकाना येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, पार्थ दादा पवार, सूरजजी चव्हाण, अविनाशजी अदिक, कपिलजी पवार यांच्या मदतीने तसेच अब्दुल भैया शेख यांच्या संकल्पनेने व माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली हजारो उपस्थितांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने सुरुवात करण्यात आली.जनता दरबारामध्ये आलेल्या महिला व पुरुषांची विविध प्रश्नांची अब्दुल भैया शेख यांनी सोडवणूक केली. त्यामध्ये रेशन कार्ड लाडक्या बहिणीचे प्रश्न डोला विषयी माहिती आरोग्य विषयी माहिती तसेच अपंग व्यक्तीसाठी विविध योजना नवीन मतदार नोंदणीसाठी आधार अपडेट सबलीकरणासाठी पिंक रिक्षा योजना, बांधकाम मधुर कामगार योजनेसाठी तसेच बचत गटासाठी अशा विविध शासकीय योजनेची माहिती तसेच त्याची सोडवणूक अब्दुल भैया शेख यांनी या जनता दरबाराच्या माध्यमातून केली.
जनता दरबार प्रसंगी मंचावर युवा नेते अब्दुल भैया शेख यांनी बोलताना म्हणाले की मला सर्व पक्षाची नेतेमंडळी सपोर्ट करतात व चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप शिवसेनाची लोक उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे व सर्वांचे स्वागत करत .अनेक प्रश्नांची सोडवणूक करत सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.पुरुषोत्तम चिंधे यांनी प्रास्ताविक केले व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अशोक मोरे, उत्तर महाराष्ट्र कामगार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मकरंद राजहंस यांनी आपले मनोगत व्यक्त करत जनता दरबारात शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब कार्यक्रमाची गर्दी पाहून व अब्दुल भैय्या यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी स्वतः मोठ्या मनाने येऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास माजी सरपंच एकनाथ कावरे विद्यमान उपसरपंच सोमनाथ कचरे, सतीश गोडसे अभिराज आरगडे ह भ प कैलास महाराज रिंधे, सद्दाम पटेल आदी मान्यवर व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. जमाल भाई शेख व इम्तियाज शेख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.




