नेवाशात आज भव्य तिरंगा शौर्य यात्रा मिरवणूक धुमधडाक्यात संपन्न

नेवाशात आज भव्य तिरंगा शौर्य यात्रा मिरवणूक धुमधडाक्यात संपन्न

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
*आज नेवासा फाटा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे चालू असलेले स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान आयोजित व संस्कार संस्कृती व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. तेजश्रीताई विठ्ठल राव लंघे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून नवदुर्गांना मोलाचे मार्गदर्शन केले व शिबिरातील नवदुर्गांना मार्गदर्शन रुपी उत्स्फूर्त मार्गदर्शन त्यामध्ये स्त्री म्हणजे माता दुर्गेचे रूप आणि या नवदुर्गांना घडवण्याचे किती गरजेचे व महत्त्वाचे काम करणाऱ्यांचे मनापासून आभार मानले आपल्या जीवनात कशाप्रकारे संघर्षाला सामोरे जाऊन यशाचे शिखर चढता येते आणि संघर्ष करणाऱ्याला यश मिळते या संदर्भात उदाहरणे देऊन मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले .मुलींना या वयामध्ये कराटे, लाठी काठी, यष्टी खेळ, तलवारबाजी, भालाफेक, रायफलबाजी, योगासन, ध्यानधारणा व विविध बौद्धिक सत्र, अंतराळ विज्ञान ,जंगल सफारी ,सामान्य ज्ञान, चरित्र अभ्यास, मनोरंजन, रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा, व विविध मान्यवरांचे मार्गदर्शन याप्रसंगी आपल्या तालुक्यातील 13 ते 25 वयोगटातील मुलींनी आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा वेळ व्यर्थ न घालता या संस्कार शिबिराचा लाभ घेऊन सत्कारणी लावत आहे व त्यातून पुढील भविष्यासाठी शिकवण घेत आहे आजच्या पिढीसाठी हे खूप महत्त्वाचे ठरत आहे . लहान वयात झालेले संस्कार आपले जीवननात अमूराग्र बदल घडू शकते यावा अशा विविध विषयावर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसोबत ताईंनी मनमोकळा संवाद साधला. त्यानंतर त्यांचा सन्मान स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानचे सदस्यांच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी सौ मंगल ताई काळे, वर्गाच्या वर्गाधिकारी चारुता ताई करूडकर, वर्गाचे पालक श्री जयप्रकाश जी खोत,कविताताई श्रोत्रीय, स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा अमृताताई नळकांडे, सचिव कृपाताई श्रोत्रीय, श्रीकांत नळकांडे, प्रशांत बहिरट, सचिन काळे,आदिनाथ पटारे , बापूसाहेब दारकुंडे ,वर्गाच्या शिक्षिका रोहिणी ताई टोळ, भार्गवीताई मापारी,ऋतुजा परदेशी ,वेदश्री निकम ,गायत्री निकम ,श्रुती मिटकरे ,राजलक्ष्मी गवळी आदी प्रशिक्षणार्थी व त्यांचे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोपानंतर नेवासा शहरातून नवदुर्गांची शौर्य तिरंगा यात्रा मिरवणूक मळगंगा देवी पासून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत धूम धडाकाकाढण्यात आली त्यामध्ये पारंपरिक ढोल पथक , भारत माता चे व अहिल्याबाई होळकर व सावित्रीबाई फुले यांची बालगोपाळांना रूप देऊन त्यांची रथातून हातात तिरंगा झेंडे घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये तलवारबाजी आदि प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. नेवास्करांच्या वतीने तोफांची सलामी देत प्रशिक्षणार्थींचे व पदाधिकाऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले रॅलीच्या समारोपप्रसंगी पेहलगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पारंपारिक वाद्य नी नेवासा शहर परिसर सौदामिनीने गजबजवून टाकला तिरंगा शौर्य मिरवणूक प्रसंगी नेवासा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश शेटे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रताप राजे चिंधे पाटील, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ अमृता ताई नळकांडे ,भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कोलते,श्रीकांत नळकांडे, शाम भाऊ मापारी आदी उपस्थित होते.




