न्यू लिटल स्टार प्री प्रायमरी स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.

न्यू लिटल स्टार प्री प्रायमरी स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.
भेंडा – ( प्रतिनिधी )महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील भेंडा बु ॥ येथील न्यू लिटल प्री प्रायमरी स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
यावेळी व्यासपिठावर प्रगतशिल शेतकरी आण्यासाहेब भगत, भारत सर्व सेवा संघ संस्था पाचेगाव संचलित – गेवराई न्यू इंग्लिश स्कूल च्या माजी मुख्याध्यापिका – सौ अलका पाटिल, मुख्याध्यापक – संजय राजगुरू, भेंडा बु च्या माजी सरपंच – सुमनताई काळे – रोहिणी निकम, प्रा उषा मिसाळ, उपसरपंच – संगिता नामदेव शिंदे, स्मिता देवेंद्र काळे, डॉ संतोष फुलारी,अजित रसाळ, आबासाहेब काळे, लताताई गोरेआदी प्रमुख मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते .
श्री कृष्ण मंगल कार्यालयात न्यू लिटल प्री प्रायमरी स्कूल चे स्नेह संमेलन पार पडले या प्रसंगी लहानग्यांनी वेग वेगळ्या सांस्कृतिक गाणी, नाच गाणी तसेच कला कृती सादर करून उपस्थितांचे मने जिंकली
पालकांनी ही त्यांना बक्षीस रूपी दाद देवून कार्यक्रमाची शोभा वाढवली
या कार्यक्रमास बाळासाहेब वाघुले, सुभाष केकाण, विमल देवकर, डॉ खेडकर, संगिता गव्हाणे, सुवर्णा गावडे, सय्यद मॅडम, भारती काथे, प्रास्तविक अमोल गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन – प्रविण कोकरे, सचिन गावडे व आभार संचालिका – अंजली गोरे यांनी मानले