लाडक्या बहिणींच्या हाकेला आमदार भावाची साद ताफा थांबवत आमदार लंघेंनी घेतल्या लाडक्या बहिणींच्या व्यथा समजावून….

आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आपला ताफा थांबवत सलाबतपुर येथील लाडक्या बहिणींच्या घेतल्या अडी अडचणी समजावून व पूर्ण करण्याचे दिली आश्वासन……
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांचा काल सायंकाळी जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता आमदार लंघे हे सलाबतपुर स्टॅन्ड वरती आल्यानंतर काही महिला कामावरून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून घराकडे चाललेल्या असताना त्यांनी आमदार लंघे यांना बघताच भाऊ म्हणून हाक मारली व आमदार लंघेनी त्वरित आपल्या गाड्यांचा ताफा थांबवत सर्व महिला माता-भगिनींना हात जोडून त्यांचे प्रथमतः आभार व्यक्त केले .
तसेच यावेळी ट्रॅक्टर मध्ये चाललेल्या महिला माता भगिनींनी सलाबतपुर येथील पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातील अडीअडचणी आमदार लंघेंना बोलून दाखवल्या.
तसेच आमदार लंघे यांनी महिला माता-भगिनींशी बोलताना सांगितले की माझ्या बहिणींचा डोक्यावरचा हंडा उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही व पेयजल योजनेची जी काही कामे रखडलेली आहेत तसेच या गावाला पाणी आणण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी करेल व पूर्ण आमदारकी पणाला लावून मी माझ्या माता भगिनींच्या पाण्याची वणवण बंद करेन असा शब्द यावेळी त्यांनी या माता भगिनींना दिला.
ते पुढे बोलताना म्हणाले की मी सलाबतपूर गावामध्ये येत्या काळात पाणी आणल्या स्वस्त बसणार नाही व माझ्या माता भगिनींची पाण्यासाठी वन वन थांबवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा शब्द त्यांनी त्या महिलांना दिला.
आमदार लंघे पुढे बोलताना म्हणाले की लाडक्या बहिणीच्या सहकार्यानेच मी आज आमदार झालो असल्याचेही त्या महिलांना बोलून दाखवले येत्या काळामध्ये तुमचा हा भाऊ सलाबतपूरचा पाण्याचा प्रश्न मी नक्कीच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी या महिलांना ठोस असे आश्वासन या वेळी बोलताना दिले.
या ठोस आश्वासनानंतर त्या महिलांच्या चेहऱ्यावरती समाधान पहावयास मिळत होते. आमदार लंघें ना त्यावेळी महिला बोलताना म्हणाल्या की आम्हा सर्वसामान्य महिलांना पाहून आमदार थांबलेत आणि आमच्या व्यथा समजावून घेतल्या याबद्दल त्यांनी आमदार विठ्ठलराव लंघें यांचे आभार व्यक्त केले.




