कृषीसखी श्रीमती विद्या भास्कर भिसे यांचा सन्मान..

कृषीसखी श्रीमती विद्या भास्कर भिसे यांचा सन्मान..
शेवगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा.
दि.२६जानेवारी२०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेवगावचे मा.तहसीलदार आकाश दहाडदे साहेब, तालुका कृषी अधिकारी मा.अंकुश जोगदंड साहेब, गट विकास अधिकारी मा.सोनल शहा मॅडम यांच्या हस्ते “महाविस्तार ए.आय.” ॲप मोहिमेत उत्कृष्ट काम केलेल्या मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सखी यांचा सन्मान तहसील कार्यालय – शेवगाव, जि.अहिल्यानगर येथे करण्यात आला.यात
“राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन” (NMMF) अंतर्गत नियुक्त असलेल्या कृषी सखींनी शेवगाव तालुक्यामध्ये “महाविस्तार ए.आय.” ॲपच्या माध्यमातून AI शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी शेवगाव तालुक्यात राबवण्यात आलेल्या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कृषीसखी श्रीमती विद्या भास्कर भिसे (दहिगाव-ने) यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसील कार्यालय – शेवगाव, जि.अहिल्यानगर येथे गट विकास अधिकारी मा.सोनल शहा मॅडम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला




