Breaking
ई-पेपरराजकिय

*शिरसगावात आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या संकल्पनेतून शासकीय योजना व मार्गदर्शन मेळावा; २० बचत गटांना धनादेश वाटप*

धनादेश वाटप* *दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी, महिलांना सक्षम करण्याचा संकल्प!*

0 9 5 0 2 3

*शिरसगावात आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या संकल्पनेतून शासकीय योजना व मार्गदर्शन मेळावा; २० बचत गटांना धनादेश वाटप*

*दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी, महिलांना सक्षम करण्याचा संकल्प!*

नेवासा तालुका | प्रतिनिधी

दुष्काळाच्या झळांनी शेतकरी अडचणीत असताना एकही पात्र शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, महिलांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देतानाच बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच भरकटलेल्या तरुणाईला रोजगाराची दिशा देण्यासाठी स्वतंत्र मेळावा घेण्यात येईल, असा निर्धार आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी शिरसगाव येथे व्यक्त केला.

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या संकल्पनेतून व सौ. रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी शिरसगाव येथील जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणात ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शन तसेच शासकीय योजना मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विविध शासकीय योजनांची माहिती देतानाच २० महिला बचत गटांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, अपंग निवृत्तीवेतन योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांना मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी मेळाव्यात उपस्थित होते. पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सौ. रत्नमाला लंघे पाटील यांनी महिलांशी संवाद साधताना भावनिक आवाहन केले. “कधीही आई म्हणून मला हाक द्या, तुमच्या हाकेला मी तत्पर आहे. प्रत्येक महिला आपल्या कुटुंबासाठी धडपडत असते. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याबरोबरच आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी योग्य संस्कार करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे,” असे त्या म्हणाल्या.

शिरसगावसह नेवासा तालुक्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र मोठा मेळावा घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आजची तरुणाई विविध कारणांनी भरकटत आहे. अशा तरुणांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, ही आपली प्रामाणिक भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी आपल्या भाषणातून दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा गांभीर्याने मांडला. “संपूर्ण नेवासा तालुक्यात दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये,” असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टंचाई आढावा बैठकीत तालुक्यातील परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली असून, तलाठी व कृषी सहाय्यकांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करून राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे आमदार लंघे पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच पाणीटंचाईचा प्रश्नही गांभीर्याने हाताळला जात आहे. शेतकऱ्यांच्या पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून छोटे-मोठे बंधारे व ओढ्यांमध्ये पाणी सोडण्याच्या दृष्टीनेही पाठपुरावा केला जाणार असल्याचे आमदार लंघे पाटील यांनी स्पष्ट केले.

तहसीलदार संजय बिराजदार यांनी सांगितले की, आमदार लंघे पाटील यांच्या पुढाकाराने २० बचत गटांना धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी उपस्थित होते. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सुमारे ५० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामेही पूर्ण करण्यात येतील. प्रशासन आमदार लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाभर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यामुळे एकीकडे ज्येष्ठ नागरिक व पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळाली, तर दुसरीकडे महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन काम करण्याचा संदेश देण्यात आला. त्यामुळे शिरसगावातील हा मेळावा केवळ शासकीय योजनांचा कार्यक्रम न ठरता महिला सक्षमीकरण, शेतकरी मदत आणि युवा रोजगार या तीनही आघाड्यांवर दिशा देणारा ठरला.

या कार्यक्रम प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, सौ रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील, तहसीलदार संजय बिराजदार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, कृषी अधिकारी धनंजय हिरवे, पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन, तालुका अभियान व्यवस्थापक अर्जुन सोनवणे, ग्रामसेवक आगळे भाऊसाहेब, राजेंद्र निंबाळकर, डॉक्टर देवरे, रवींद्र काळे, ज्ञानेश्वर कांबळे, प्रदीप ढोकणे ,लक्ष्मण सोडके, दत्तात्रय पोटे, नवनाथ साळुंके ,सुनील वाघमारे ,गणेश लंघे, राजेंद्र पोटे, दादासाहेब पोटे, गणेश चौघुले, आदिनाथ पटारे, किरण शिंदे, विवेक लंघे ,सुरेश गायकवाड, रमेश शिरोडे, मच्छिंद्र मुंगसे, आदिनाथ थोरे ,वांडेकर मॅडम ,शालीनी लंघे, मंगल काळे, राजश्री शिंदे, पद्मा शेरकर ,शितल गारदे, पूनम कपिले आदी महिला बचत गटाच्या सदस्य अध्यक्ष पदाधिकारी शिरसगाव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे