Breaking
ई-पेपर

कुकाण्यातील उपोषणकर्त्यांना जिल्हा रुग्णालयात हालविले…

रुग्णालयात ही उपोषण सुरूच

0 6 0 5 1 9

कुकाण्यातील उपोषणकर्त्यांना जिल्हा रुग्णालयात हालविले…

नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

बेलापूर- परळी रेल्वे मार्गासाठी बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे सूरु असलेल्या आमरण उपोषणाचा दहावा दिवस असून उपोषणकर्त्यांना अशक्तणा व चक्कर येत असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणी करिता नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हालविण्यात आले आहे.

बेलापूर- परळी रेल्वे मार्गासाठी बेलापूर-परळी रेल्वे कृती समितीच्या वतीने  रितेश विजयकुमार भंडारी,रज्जाक निजामशा इनामदार व सुरेश वसंतराव नरवणे यांनी  सोमवार पासून दि.९ पासून कुकाणा  येथे ग्रामपंचायत स्टेजवर आमरण उपोषण सुरू केले आहे. दि.१७ फेब्रुवारी हा
उपोषणा ९ वा दिवस होता.
उपोषणकर्त्यांनी त्यांना अशक्तणा व चक्कर येत असल्याचे वैद्यकीय विभागाला कळविल्याने *तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपक डिंबर,कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कानडे*
व त्यांचे पथकाने उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली. दि.१८ फेब्रुवारी हा उपोषणाचा १० वा दिवस असल्याने खबरदारी म्हणून पुढील वैद्यकीय तपासण्यासाठी उपोषणकर्त्यांना नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती डॉ.डिंबर यांनी दिली.

*उपोषण सुरुच राहणार…*

दरम्यान आमच्या प्रकृतिमध्ये अश्वस्थपणा जाणवल्याने व प्रकृति ढासळल्याने आज आम्हाला जिल्हा रुग्णालयात जात असलो तरी आमचे मंजूरी पत्र मिळे पर्यंत आमरण उपोषण सुरुच राहणार आणि आम्ही रुग्णालयात असलो तरी उपोषण स्थळी चक्री उपोषण सुरुच राहणार असल्याचे उपोषणकर्ते रितेश भंडारी यांनी स्पष्ट केले.
—————————-

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे