Breaking
ई-पेपर

जळके खुर्द येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहा मध्ये साजरी..

0 6 0 5 3 3

जळके खुर्द येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहा मध्ये साजरी……

नेवासा प्रतिनिधी-  महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

ग्रामपंचायत कार्यालय व गुरुदास भास्करगिरी महाराज माध्य विद्यालय जळके खुर्द येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जि प प्राथ शाळा जळके खुर्द येथे बाल मित्र विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व मनोगत केले तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

तसेच आंबेडकरनगर जळके खुर्द येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिसरन, पंचशील द्वारे अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे या प्रसंगी चिमुलके भीमसैनिक विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची भाषणे झाली, याप्रसंगी विठ्ठल परदेशी, रशिद पटेल, प्रा हरिश पंडित, बाळासाहेब गोरे यांनी मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ॲड राजेंद्र पंडित यानी आपले अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना म्हणाले की बाबासाहेबांची महानता आयुष्यभर मिळालेली हिनतेची, अस्पृष्यतेची वर्तनुक त्यांना दलित म्हणून बसलेले चटके राज्यघटना संविधान लिहताना त्यांच्या विचारात सुद्धा आले नाही त्यांनी सर्वाना समता, स्वातंत्र्य व बंधुता या त्रिसूत्री चा वापर समाजातील सर्व घटकासाठी उपयोगी अशी राज्यघटना लिहली, अशा प्रकारे विविध ठिकाणी बोधिसत्व, परमपूज्य, महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी जळके खुर्दचे सरपंच ॲड. राजेंद्र पंडित, मेजर अरुण मोरे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, सोसायटी व्हा चेअरमन संतोष परदेशी, तंटामुक्ति अध्यक्ष रशिद पटेल, गुरदास विद्यालयचे प्राचार्य जयराम जाधव सर तसेच विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी, जि प प्राथ शाळेचे मुख्याध्यापक नरोडे सर त्यांचे सर्व सहकारी, उर्दू शाळेचे शेख सर, अंगणवाड़ी सेविका, मदतनिस, विद्यार्थी बाल मित्र-मैत्रिण, प्रा. हरिश पंडित सर, ग्रा पं सदस्य विठ्ठल काका परदेशी, बाळासाहेब गोरे, बाळासाहेब शिंदे, सोसायटी सदस्य दत्तात्रय जगदाळे, ग्रामस्थ लतिब पठाण, अमीन पठाण, गणीभाई पठाण, साईनाथ ठाकर, दिनकर चिमणे, रईस पठाण, गजानन कपीले, पवन परदेशी, माउली चौधरी, संदिप औटी, प्रविण क्षिरसागर, भीमसैनिक अशोक सोनटक्के, बाळासाहेब सोनवणे, बहिरनाथ पंडित, चेतन साळवे, प्रमोद जगदाळे, सुधाकर कोल्हे, संजय जगदाळे, भरत खरात, अरूण पंडित, सुधिर जगदाळे, शाम साळवे, हरीभाऊ आढागळे,भारत पंडित, संजय साळवे, बबलु साळवे,भाऊसाहेब पंडित, अविनाश साळवे दिशांत केदारी, प्रेम आढागळे, राहुल पंडित, स्वप्निल पवार, संकेत जगदाळे, आकाश आढागळे, पप्पू पवार, प्रशांत पंडित, साहिल आढागळे, मनोज बोर्डे, ज्ञानेश्वर आढागळे, तसेच मोठया संखेने माता- भगीनी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे