Breaking
ई-पेपर

शिरसगाव येथील जगदंबा माता यात्रा उत्सवाला आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते नारळ फोडून यात्रेला प्रारंभ…..

0 4 6 2 1 9

शिरसगाव येथील जगदंबा माता यात्रा उत्सवाला आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते नारळ फोडून यात्रेला प्रारंभ…..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

शिरसगाव येथील जगदंब यात्रा उत्सवाला सालाबाद प्रमाणे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला आहे.

यावेळी विठ्ठलराव लंघे म्हणाले गावचे ग्रामदैवत म्हणून आपली जगदंबा माता यात्रा उत्सव आज सुरू होत आहे तरीही सर्व ग्रामस्थांनी यथाशक्ती यात्रा उत्सव मध्ये योगदान द्यावी तसेच शांततेमध्ये पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान गावकऱ्यांना आमदार लंघे यांनी केले.

याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने विविध सूचना मांडण्यात आल्या तसेच आमदार लंघे यांच्या माध्यमातून त्या सूचनाचे निरसन जागेवरच करण्यात आले .

आमदार लंघे बोलताना म्हणाले की जगदंबा माता मंदिर हे आपले ग्रामदैवत असून या यात्रा उत्सवासाठी सर्व ग्रामस्थांनी हा यात्रा उत्सव आनंदामध्ये पार पाडण्यासाठी सहकार्य करावे तसेच या यात्रा उत्सवांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले जातील आपल्या ग्रामदेवत जगदंबा माता मंदिराची ख्याती जिल्हाभर आहे तरीही परिसरातून येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी सुख सुविधाच नियोजन केले जाईल असे आमदार लंघे म्हणाले. या जगदंब माता यात्रा उत्सवाच्या नियोजन बैठकीदरम्यान समस्त ग्रामस्थ शिरसगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या यात्रा उत्सवाच्या दरम्यान खाऊचे दुकाने तसेच भेळीचे दुकाने तसेच सौंदर्य प्रसादानाचे दुकाने तसेच विविध हार फुलांचे दुकाने येताना शिरसगाव मध्ये पहावयास मिळत आहे. शिरसगाव येथील हा जगदंबा माता यात्रा उत्सव पुरातन काळापासून नावलौकिक आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 2 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे