Breaking
ई-पेपर

साखर कामगारांच्या वेतन वाढीच्या त्रिपक्ष समितीची दि १५ रोजी मुंबईत पहिली बैठक.

0 4 6 0 6 0

साखर कामगारांच्या वेतन वाढीच्या त्रिपक्ष समितीची दि 15 रोजी मुंबईत पहिली बैठक.

सोनई – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

राज्यातील साखर कामगारांच्या मागण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या त्रिपक्ष समितीची पहिली बैठक दिनांक 15 रोजी मुंबई येथील साखर संघाच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता होणार असल्याची माहिती त्रिपक्ष समितीचे सदस्य डी एम निमसे यांनी सांगितले याबाबत अधिक माहिती देताना निमसे म्हणाले की त्रिपक्ष समितीतील सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ या दोन राज्यव्यापी संघटनाच्या पाठपुराव्यामुळे साखर कामगारांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समिती मध्ये साखर कामगार संघटनेच्या वतीने प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे सरचिटणीस शंकरराव भोसले कार्याध्यक्ष राऊ पाटील अविनाश आपटे महासंघाचे अध्यक्ष पी के मुंडे महासंघाचे सरचिटणीस आनंदराव वायकर सत्यवान शिखरे शिवाजी आवटी प्रतिनिधी मंडळाचे कोषाध्यक्ष प्रदीप बनके उपाध्यक्ष राजेंद्र तावरे युवराज रणनवरे डीएम निमसे फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदीक हे स्थापन करण्यात आलेल्या त्रिपक्षी प्रतिनिधी समितीत आहे ही बैठक मुंबईतील साखर संघाच्या कार्यालयांत दुपारी ठीक तीन वाजता सुरू होईल नवीन वेतन वाढ थकीत पगार किमान वेतन व इतर प्रलंबित असलेल्या प्रश्नावर बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे अशी माहिती अहिल्या नगर जिल्हा साखर कामगार समन्वय समितीचे सरचिटणीस डीएम निमसे व मुळा साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार यांनी ही माहिती दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे