Breaking
ई-पेपर

* काम, समान वेतनाच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन करताना न्यायालयीन कर्मचारी*

समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचारी आक्रमक *

0 9 5 0 2 3

समान काम, समान वेतनाच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन करताना न्यायालयीन कर्मचारी.

समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचारी आक्रमक *

करजगाव /नेवासा : समान काम, समान वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी नेवासा न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १६) काळ्या फिती लावून
दैनंदिन कामकाज केले. जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील नेवासा न्यायालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होत
मागणीला पाठिंबा दिला. लघुलेखक, गट-क कर्मचारी, बेलीफ व गट-ड कर्मचारी या चारही महासंघांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार
नेवासा न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी शांततेत आंदोलन केले. या आंदोलनात नेवासा न्यायालयातील अधीक्षक श्रीमती घोरपडे, श्री. पगारे,
सहा. अधीक्षक श्रीमती ससे आणि श्री. खान तसेच नेवासा न्यायालयातील सर्व लघुलेखक, लिपीक, बेलीफ व गट ड कर्मचारी सहभागी झाले होते . –

समान काम, समान वेतनाची मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा चारही महासंघांनी दिला आहे.त्यानुसार सामूहिक रजा,
तर ६ व ७ नोव्हेंबर रोजी अन्नत्याग करून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही शासनाने प्रलंबित प्रस्तावावर कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय
न घेतल्यास १७नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, ही रास्त मागणी
असल्याचे लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष राम बेल्हेकर यांनी सांगितले
——-
कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन
वाढती महागाई व तुटपुंज्या वेतनामुळे न्यायालयीन कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू केले आहे.
मागणी मान्य होईपर्यंत माघार घेतली जाणार नसल्याचा निर्धार गट-ड संघटनेचे सचिव स्वप्निल ढोले यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे