Breaking
ई-पेपरमहाराष्ट्रराजकिय

*विजेच्या धक्याने मृत्यू झालेल्या निष्पाप मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत द्या; नेवासा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची विधानसभेत ठाम मागणी*

0 8 9 9 5 5

*विजेच्या धक्याने मृत्यू झालेल्या निष्पाप मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत द्या; नेवासा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची विधानसभेत ठाम मागणी.*

मुंबई | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7 न्यूज वृत्तसेवा

पावसाळी अधिवेशनात नेवासा मतदारसंघातील विजेच्या धक्क्यामुळे झालेल्या सलग मृत्यूंचा अत्यंत गंभीर प्रश्न नेवासा आमदार मा. श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले.
महावितरणाच्या कथित निष्काळजीपणामुळे अवघ्या काही दिवसांत तीन निष्पाप मुलांना आपला जीव गमवावा लागल्याची खंत व्यक्त करत, उघडे डीपी, जीर्ण व धोकादायक वीजवाहिन्या तसेच असुरक्षित विद्युत खांबांमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी दिवंगत ईश्वर वैरागर, श्रावण गायकवाड आणि सौरभ यादव यांच्या कुटुंबियांना महावितरण आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ₹१० लाखांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार लंघे पाटील यांनी केली.
यासोबतच नेवासा मतदारसंघातील सर्व उघडे डीपी, जीर्ण वीजवाहिन्या आणि धोकादायक विद्युत खांबांची युद्धपातळीवर तपासणी करून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचीही त्यांनी सरकारकडे मागणी केली.
“वीज सुविधा नागरिकांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी असते; निष्पाप जीव घेण्यासाठी नाही,” असे ठाम मत व्यक्त करत नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सभागृहात केले.
नेवासा मतदारसंघात वारंवार घडणाऱ्या विद्युत अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा विषय विधानसभेत जोरदारपणे मांडला गेल्याने आता सरकार आणि महावितरण कोणती ठोस भूमिका घेते, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे