*नाथ संकेत ११११ कापूस वाणाची प्रगतशील शेतकरी विलासराव देशमुख यांच्या शेतात पाहणी*
*सशक्त वाढ व चांगल्या पीक परिस्थितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष*

*नाथ संकेत ११११ कापूस वाणाची प्रगतशील शेतकरी विलासराव देशमुख यांच्या शेतात पाहणी*
*सशक्त वाढ व चांगल्या पीक परिस्थितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष*
नेवासा प्रतिनिधी :
कुकाणा, ता. नेवासा येथील प्रगतशील शेतकरी विलासराव देशमुख यांच्या देवसडे शिवरातील शेतावर नाथ बायोजीन्स इंडिया लि., छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ‘नाथ संकेत ११११’ या कापूस वाणाच्या प्रात्यक्षिक पीक पाहणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी नाथ सिड्सचे अहिल्यानगर प्रतिनिधी सतीश तानवडे तसेच मराठवाडा विभागीय व्यवस्थापक सुनील तुपे यांच्यासह शेतकरी व कृषी क्षेत्राशी संबंधित उपस्थितांनी देशमुख यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान पिकाची वाढ, झाडांची जोमदार स्थिती, फुलोरा तसेच एकूण पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
प्रगतशील शेतकरी विलासराव देशमुख यांनी नाथ संकेत ११११ या वाणाची लागवड करून घेतलेल्या पिकाची चांगली वाढ व समाधानकारक पीक परिस्थिती उपस्थितांना दाखवून दिली. प्रत्यक्ष शेतात उभे असलेले पीक पाहता या वाणाच्या लागवडीबाबत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
यावेळी नाथ सिड्सच्या प्रतिनिधींनी नाथ संकेत ११११ कापूस वाणाची वैशिष्ट्ये, लागवड पद्धती आणि पिकाच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिक शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून वाणाची माहिती घेतल्याने शेतकऱ्यांना निर्णय घेण्यास मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अशा प्रात्यक्षिक प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी करून पिकाची वाढ, परिस्थिती व व्यवस्थापन समजून घ्यावे, असे आवाहन नाथ सिड्सच्या वतीने करण्यात आले.




