Breaking
ई-पेपर

*तहसीलदार संजय बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण; आमदार विठ्ठलराव लंघे यांचे तरुणाईला देशाच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन*

*नेवासा तहसील कार्यालयात ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात*

0 9 5 0 2 3

*नेवासा तहसील कार्यालयात ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात*

*तहसीलदार संजय बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण; आमदार विठ्ठलराव लंघे यांचे तरुणाईला देशाच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन*

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क

 

भारताच्या स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ८०वा स्वातंत्र्य दिन नेवासा तहसील कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार संजय बिराजदार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील उपस्थित होते.


ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले, “देशाच्या स्वातंत्र्याचा ८०वा वर्धापन दिन साजरा करताना देशाची तरुणाई मोठ्या उत्साहाने पुढे येत आहे. हीच तरुणाई देशाचे भवितव्य असून, भारत देश आगामी काळात मोठी भरारी घेणार आहे. या विकासप्रवासात प्रत्येक भारतीय नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.”
यावेळी त्यांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे देशभरातील नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी अभिमान आणि राष्ट्रभावना अधिक दृढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
“नेवासा तालुक्यात प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन काम करावे. भविष्यातील पिढी सक्षम, सुसज्ज आणि जबाबदार नागरिक म्हणून घडावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे आवाहनही आमदार लंघे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले, तर सोनाली म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, तहसीलदार संजय बिराजदार, दुर्योधन सुदर्शन, संजय लखवाल, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, सोनाली म्हात्रे, निखिल फराटे, संदीप चिंतामणी, पठारे साहेब, गव्हाणे रावसाहेब, अनिल गव्हाणे, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, अॅड. संजय सुखदान यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, नेवासा शहरातील पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे