Breaking
ई-पेपर

*त्रिमूर्तीच्या वेदांतची सुवर्णकामगिरी; कारकिर्दीतील ५० वे पदक जिंकत रचला इतिहास* *जर्मनीतील जागतिक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर 3P प्रकारात सांघिक कांस्यपदक; ऑलिंपिक स्वप्न साकार होण्याच्या दिशेने मोठे पाऊल*

0 8 9 9 5 5

*त्रिमूर्तीच्या वेदांतची सुवर्णकामगिरी; कारकिर्दीतील ५० वे पदक जिंकत रचला इतिहास*
*जर्मनीतील जागतिक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर 3P प्रकारात सांघिक कांस्यपदक; ऑलिंपिक स्वप्न साकार होण्याच्या दिशेने मोठे पाऊल*

नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

जर्मनी येथे १६ जून ते २७ जून २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल, नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय नेमबाज वेदांत नितीन वाघमारे याने ५० मीटर 3P (थ्री पोझिशन) प्रकारात भारतीय संघाकडून सांघिक कांस्यपदक पटकावत आपल्या कारकिर्दीतील ५० वे पदक जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे.
वेदांतने गेल्या सात वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासह त्रिमूर्ती संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. आतापर्यंत त्याने ९ आंतरराष्ट्रीय, २५ राष्ट्रीय आणि १६ राज्यस्तरीय, अशी एकूण ५० पदके जिंकून नेमबाजी क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक शिक्षण महर्षी स्व. साहेबराव घाडगे पाटील यांचे “माझ्या त्रिमूर्तीचा विद्यार्थी ऑलिंपिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकेल” हे स्वप्न वेदांतच्या यशस्वी वाटचालीमुळे प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याची भावना त्रिमूर्ती परिवाराने व्यक्त केली आहे.
वेदांतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. सुमती साहेबराव घाडगे पाटील, उपाध्यक्षा ॲड. स्नेहल चव्हाण पाटील, सहसचिव डॉ. श्रुती आमले पाटील, कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव आमले पाटील, विश्वस्त चेतन चव्हाण पाटील, समन्वयक डॉ. अनुराधा गोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांगदेव आरसुळे, डॉ. बर्गे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वेदांत वाघमारे याला रायफल शूटिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक छबुराव काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, त्याच्या मेहनतीला आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळालेले हे यश भविष्यात भारतासाठी ऑलिंपिक पदकाचे स्वप्न साकार करण्याची आशा अधिक बळकट करणारे ठरत आहे.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे